Agriculture news in Marathi, Pune district in rain | Agrowon

पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या आहेत. मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे सर्वाधिक ५२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे भात पिके तरारली असून पूर्वेकडील तालुक्यातील तूर पिकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या आहेत. मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे सर्वाधिक ५२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे भात पिके तरारली असून पूर्वेकडील तालुक्यातील तूर पिकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाने जोर धरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पुणे शहर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या भागात अधूनमधून पाऊस पडत होता. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणातून पाण्याचा काही प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे. हवेलीतील खडकवासला परिसरात जोरदार पाऊस पडला असून सर्वाधिक १३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच पुणे शहर, केशवनगर, कोथरूड, थेऊर, उरूळी कांचन, खेड शिवापूर, भोसरी, वाघोली चिंचवड, कळस, हडपसर या उपनगरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.

मुळशी तालुक्यातील पिंरगुटनंतर पौड येथे ४० मिलिमीटर पाऊस पडला. तर घोटावडे येथे २५, माले १८ मिलीमीटर पाऊस पडला. भोरमधील आंबवडे येथे २२ मिलिमीटर पाऊस पडला. तर भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर येथे हलका पाऊस पडला.

मावळातील तळेगाव, काळे कॉलनी, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे, वेल्हा तालुक्यांतील वेल्हा, पानशेत, विंझर, आंबवणे येथेही हलका पाऊस पडला. जुन्नरमधील बेल्हे येथे सर्वाधिक ४६ मिलिमीटर पाऊस पडला. तर नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. खेडमधील कन्हेरसर येथे ४१ मिलिमीटर पाऊस पडला. तर कुडे येथे ३७, कडूस २८, वाडा २१, चाकण २४ मिलिमीटर पाऊस पडला; तर राजगुरूनगर, पाईट, आळंदी, शेळपिंपळगाव येथे हलका पाऊस पडला. आंबेगावमधील घोडेगाव २०, डिंभे १७, कळंब २२, पारगाव २७.५९, मंचर २८ मिलिमीटर पाऊस पडला. 

शिरूरमधील टाकळी, वडगाव रसाई, न्हावरे, मलठण, रांजणगाव, पाबळ, शिरूर हलका पाऊस पडला. बारामतीतील माळेगाव येथे ३८ मिलिमीटर पाऊस पडला. तर पणदरे, लोणी भापकर, सुपा, मोरगाव, उंडवडी येथे हलका पाऊस पडला. इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव केतकी, अंथुर्णे, सणसर येथे हलका पाऊस पडला. 

दौंडमधील वरवंड येथे २५ मिलिमीटर पाऊस पडला असून देऊळगाव राजे, यवत, केडगाव, राहू, रावणगाव, दौड येथे पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या. पुरंदरमधील भिवंडी येथे ३१ मिलिमीटर पाऊस पडला. तर सासवड, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हे येथेही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारी पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...
तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनमहाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक असलेल्या तुरीची...
औरंगाबादेत सीताफळ २५०० ते ७००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धो धो पावसात भिजत शरद पवारांचे...सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद...
सियाम कडून पूरग्रस्तांसाठी दीड कोटींचे...औरंगाबाद  : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित...