Agriculture News in Marathi In Pune district Rain exposure | Agrowon

पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक ठिकाणी उघडीप दिली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक सरी पडल्या.

पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक ठिकाणी उघडीप दिली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक सरी पडल्या असून, मावळातील पवना धरण क्षेत्रात अवघा आठ मिलिमीटर पाऊस पडला आहे. धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून भात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. 

गेल्या १५ ते २० दिवस जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे पिकांना पोषक पाऊस झाल्याने पिके चांगलीच तरारली आहेत. सध्या तूर, कापूस, बाजरी पिके वाढीच्या व काढणीच्या अवस्थेत आहेत. तर बाजरी पिके कणसाच्या अवस्थेत आहेत. अति पावसामुळे मूग, उडीद पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. भात पिके जोमात असून, वाढीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी भात पिकांवर रोग, किडीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. 

जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस चांगलाच कोसळत होता. विशेषः हा पश्‍चिम पट्ट्यात पावसाची बऱ्यापैकी संततधार सुरू होती. त्यामुळे भात खाचरे भरल्याने ओसंडून वाहत आहेत. पूर्वेकडील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खेड भागांत सततच्या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. मात्र तूर, बाजरी पिकांसाठी हा पाऊस पोषक झाल्याने अनेक ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. आतापर्यंत बऱ्यापैकी झालेल्या पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली असून, विहिरी तुडुंब भरल्याची स्थिती आहे. त्यामुळे आगामी काळातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली आहे.  

चार दिवसांपासून सतत पाऊस; 
नगर जिल्ह्यात पिकांवर परिणाम 

नगर : नगर जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. खरिपाच्या पिकांवर मात्र पावसाचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे. नगर, नेवासा, पाथर्डी तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या नोंदीत राहुरी तालुक्यातील वांबोरी महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. कर्जत तालुक्यात मात्र अजूनही चांगला पाऊस झाला नाही. 

नगर जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती चांगली आहे. या महिन्यात नगर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. चांगल्या पावसामुळे धरणात पाणीसाठा झाला असून, अकोल्यातील पावसामुळे मुळा, भंडारदरा, निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागांत पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने खरिपातील पिकांवर परिणाम झाला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान होत आहे. भाजीपाल्याचेही नुकसान होत आहे. शेवगाव तालुक्यात काही ठिकाणी जमिनी चिभडल्या आहेत.

पीक उत्पादनावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. सकाळपर्यंत झालेला मिलीमीटरमध्ये पाऊस असा, पारनेर ः ३८, सुपा ः ४४, मांडवगण ः ३९, पाथर्डी ः ४८, माणिकदौडी ः ३७, टाकळी ः ३६, करंजी ः ५५, मिरी ः ५७, चांदा ः ३७, घोडेगाव ः ५१, सोनई ः ४४, वडाळा ः ३४, ब्राह्मणी ः ५८, वांबोरी ः १०७  
 


इतर बातम्या
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवातपुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू...
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि...
जांभा गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा...अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज...
'रासाका' सुरू करण्याच्या आश्वासनाची...नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच...
खानदेशात कांदेबाग केळीची लागवड निम्मीचजळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी...
रिसोड, जि. वाशीम :‘पळसखेड’च्या अर्धवट... रिसोड, जि. वाशीम : शासनासह अधिकाऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत मार्ग... नगर : नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत एक लाख...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून कोट्यावधीचे...परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या...
निकृष्ठ दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण...नागपूर  : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
आधार प्रमाणीकरणास १५ नोव्हेंबरपर्यंत...धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन...नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच...