Agriculture news in marathi Pune district is still far from water scarcity, good water storage | Agrowon

पुणे जिल्हा अद्याप पाणीटंचाईपासून दूर, पाणीसाठा चांगला

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

चांगला पाऊस पडल्याने पाणीसाठ्यांची स्थिती चांगली आहे. यंदा अजूनही टॅंकरची मागणी आलेली नाही. मार्चअखेरपर्यंत तरी टॅंकरची गरज भासणार नाही, अशी शक्यता आहे.
- सुरेंद्रकुमार कदम, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा

पुणे : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वदूर मुबलक पाऊस झाला. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणे, बंधारे, तलावांमधील पाणीसाठा आणि भूजल पातळीची स्थिती चांगली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोतांचे पाझरही खळाळून वाहत असल्याने जिल्ह्यात अद्यापही पाणीटंचाई भासलेली नाही. मात्र दुर्गम डोंगराळ भागासह, कोरडवाहू पट्ट्यात पाणीसाठे आटण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात भूजल पातळी कमी होऊन पाणीटंचाई वाढण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात २०१८ मध्ये पावसाने ओढ दिली होती. परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने भर पावसाळ्यातही कोरडवाहू तालुक्यांमध्ये टंचाई भासून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. हिवाळ्यातही टॅंकरच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातील ३५ गावे ३६९ वाड्यांमध्ये ६१ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. उन्हाळ्यात टंचाईची तीव्रता खूपच वाढली. मुक्या जनावरांनाही टॅंकरने पाणी पुरवावे लागले. पाण्याबरोबरच चाऱ्याचीही कमतरता भासू लागल्याने चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे पाणी टिकून 

मॉन्सूनचे राज्यातील आगमन लांबल्यानंतर टंचाईचे संकट आणखी गडद झाले. मात्र मॉन्सून दाखल होताच जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाला सुरुवात झाली. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडला. धरणे आसंडून वाहून अभूतपूर्व पूर स्थितीही निर्माण झाली. हवामान विभागाकडील नोंदीनुसार या चार महिन्यांत जिल्ह्यात १८०३.५ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा (८६१.५ मिलिमीटर) १०९ टक्के अधिक पाऊस पडला. ऑक्टोबर महिन्यातही पाऊस सुरूच होता. दुष्काळी भागात झालेल्या जलसंधारणाच्या कामांमध्येही मुबलक पाणीसाठा झाला. त्यामुळे भुजल पातळीत वाढ होण्यास मदत झाली. 


इतर बातम्या
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू...सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा...