पुणे विभागात पेरणीत सव्वा तीन लाख हेक्टरने वाढ

पुणे : चालू वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. पुणे विभागात सुमारे तीन लाख ३७ हजार १५ हेक्टर क्षेत्र वाढले आहे.
 In Pune division sowing increased over three lakh hectares
In Pune division sowing increased over three lakh hectares

पुणे : चालू वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. पुणे विभागात सुमारे तीन लाख ३७ हजार १५ हेक्टर क्षेत्र वाढले आहे. सध्या पिके वाढीच्या, काढणीच्या अवस्थेत आहेत. उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

कोरोनामुळे भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीवर भर दिला. त्यातच मॉन्सूनमुळे तूर, मूग, उडीद, कापूस, बाजरी पिकांच्या वेळेवर पेरण्या झाल्या. विभागात खरिपाचे सरासरी आठ लाख ६६ हजार ८१९ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १२ लाख ३ हजार ८३४ हेक्टरवर पेरणी झाली. सरासरी १३८ टक्के पेरणी झाली. यामध्ये बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भूईमूग, सोयाबीन, कापूस पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. उडीद पिकांच्या क्षेत्रात तब्बल दुप्पट वाढ झाली.

सुमारे एक लाख १२ हजार ५१० हेक्टरवर उडदाची पेरणी झाली.  सध्या नगरमधील अकोले व पुणे जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यात भात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पीक स्थिती समाधानकारक आहे. बाजरी, मका दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.  काही ठिकाणी मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

मुगाची काढणी सुरू आहे. काही ठिकाणी मुगावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. उडीद पक्वतेच्या अवस्थेत आहे. तूरीचे शेंडे खुडण्याचे काम चालू आहे. सोयाबीन पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. त्यावर काही प्रमाणात उंट अळी तसेच चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. कापूस बोंड लागण्याच्या अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी पिकांवर मावा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून आला.

जिल्हानिहाय खरीप पेरणी (हेक्टर) 

जिल्हा  सरासरी क्षेत्र  पेरणी क्षेत्र टक्केवारी
नगर ४,४७,९०४ ६,३४,९४७ १४१
पुणे १,८४,२७४ १,९६,१५९  १०६
सोलापूर २,३४,६४१  ३,७२,७२८ १५९
एकूण  ८,६६,८१९ १२,०३,८३४ १३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com