Agriculture news in Marathi, Pune in green chili and Carrot rate hike | Agrowon

पुण्यात हिरवी मिरची, गाजराच्या दरात वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर असून, काही भाजीपाल्याची मागणी वाढल्याने दर १० ते २० टक्क्यांनी वाढले होते. यामध्ये हिरवी मिरची, सिमला मिरची, आणि गाजराच्या भावात वाढ झाली होती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर असून, काही भाजीपाल्याची मागणी वाढल्याने दर १० ते २० टक्क्यांनी वाढले होते. यामध्ये हिरवी मिरची, सिमला मिरची, आणि गाजराच्या भावात वाढ झाली होती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १४, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ४ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे २ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३ टेम्पो, राजस्थानातून ३ ट्रक गाजर, गुजरातहून ५० पोती भुईमूग शेंग, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. 

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १२०० पोती, टॉमेटो सुमारे सहा हजार क्रेट, काकडी ८ टेम्पो, वांगी ५ टेम्पो, भेंडी ७ टेम्पो, गवार ५ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ८ टेम्पो, भुईमूग सुमारे ५० पोती, ढोबळी मिरची १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, गाजर १०० पोती, जुना कांदा ५० ट्रक तर नवीन कांदा ३० ट्रक आवक झाली होती. 

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. १७) कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची सुमारे ६० हजार जुड्यांची आवक झाली होती. 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १०००-१५००, मेथी : ८००-१५००, शेपू : १०००- १५००, कांदापात : १५०० - २५००, चाकवत : १२००, करडई : १२००-१५००, पुदिना : ४००-५००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००- १५००, राजगिरा : ८००-१०००, चुका : १०००-१२००, चवळई : १२००-१४००, पालक : १५००-१६००.

रविवारी (ता. १७) येथील बाजारात मोसंबी सुमारे २५ टन, संत्री ८ टन, डाळिंब सुमारे ३०० टन, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज १५ टेम्पो, पपई २५ टेम्पो, लिंबे सुमारे ४ हजार गोणी, पेरू ४०० क्रेटस, चिकू पाचशे डाग, सफरचंद दीड ते दोन हजार बॉक्स, विविध जातींची बोरे सुमारे ४०० गोणी, तर सीताफळाची १० टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : १५०-२००, मोसंबी : (३ डझन) : २८०-५५०, (४ डझन ) : १३०-२८०, संत्रा : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ६०-१३०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड : १०-२५, खरबूज : १०-२५, पपई : ५-३०, चिकू : ३००-८००, सीताफळ : १०-१५०, सफरचंद : सिमला (२५ ते ३० किलो) २०००-२५००, किन्नोर : २५००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ९००-१४०० बोरे (१० किलो) : चेकनट : ६५०-७००, उमराण : १२०-१४०, 
चमेली : २५०-२८०, चण्यामण्या : ४५०-५००.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : नवीन ५०-३५०, जुना : ५०० ते ६००, बटाटा : १००-२००, लसूण : १०००-१८००, आले : सातारी ४००-५००, भेंडी : २००-२५०, गवार : ४००-५००, टोमॅटो : १००-२००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : ३००-३५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : २५०-३००, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १८०-२२०, कोबी : १५०-२००, वांगी : ३००-४५०, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : १०००, गाजर : ५००-६००, वालवर : ३००-३५०, बीट : १००-१४०, घेवडा : २८०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-३००, पावटा : ५००-६००, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : परराज्य ५००-७५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

फुले
लग्नाचा हंगाम सुरू झाल्याने शोभिवंत फुलांना मागणी वाढली आहे. त्यामुळे शोभिवंत फुलांच्या भावात वाढ झाली आहे. 
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : ४०-६०, कापरी : १०-४०, शेवंती : १०-४०, अ‍ॅस्टर : १०-२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिली बंडल : ६-१०,  जरबेरा : ५०-८०, कार्नेशियन - १००-१५०.

मटण मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १७) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची सुमारे ३०० किलो, तर नदीच्या मासळीची सुमारे २ टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १४ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. दरम्यान, मागणी वाढल्याने चिकनच्या दरात १०, तर इंग्लिश अंड्यांच्या शेकड्याच्या दरात ३० रुपयांनी वाढ झाली होती. मटणाचे दर स्थिर असल्याचे माहिती व्यापारी रूपेश परदेशी, प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) 
पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १४००- १५००, मध्यम : ८००-९००, लहान ४०० भिला : ४८०, हलवा : ५५०- ६००, सुरमई : ५५०-६५०, रावस : लहान ६००, मोठा  ८००, घोळ : ६००, भिंग : ३६०, करली : २८०-३२०, करंदी : ३६०, पाला : लहान ८००, मोठे - ११००, वाम : लहान पिवळी ६००, मोठे  ८००-८५०, काळी : ४८०, ओले बोंबील : ८०-१२०, 

कोळंबी 
लहान  २८० मोठे  ४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १३००, मोरी : लहान २४०, मोठे ४००, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २००, खेकडे : २४०-२८०, चिंबोऱ्या :४८०- ५५०. 

खाडीची मासळी 
सौंदाळे : २४०-२८०, खापी : २००, नगली : लहान २८०, मोठे ७५०, तांबोशी : ४८०, पालू : २४०, लेपा : १४० , मोठे  २४०-२८०, शेवटे : २४०, बांगडा : लहान  १८० ,मोठे  २४०-२८०, पेडवी : ८०-१००, बेळुंजी : १२०-१८०, तिसऱ्या : १६०-१८०, खुबे : १२०, तारली : १४०-१८०. 

नदीची मासळी 
रहू : १४०- १६०, कतला : १६०, 
मरळ : ३६०-४००, शिवडा : २८०, चिलापी : ८०-१००, खवली : २४०-२८०, आम्ळी : १२०, खेकडे : २४० वाम : ६००.

मटण 
बोकडाचे : ५२०, बोल्हाईचे : ५२०, खिमा : ५२०, कलेजी : ५८०.

चिकन 
चिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २६०.

अंडी : गावरान : शेकडा : ७४० डझन : १०० प्रतिनग : ८.५०, इंग्लिश : 
शेकडा : ४७८ डझन : ६६ प्रतिनग : ५.५


इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...