लासूर (ता. चोपडा, जि.
ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी बाबूराव वायकर
पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतिपदी बारामती तालुक्यातील प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदी मावळचे बाबूराव वायकर, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतिपदी हवेली तालुक्यातील पूजा पारगे तर समाजकल्याण सभापतिपदी दौंड तालुक्यातील सारिका पानसरे यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतिपदी बारामती तालुक्यातील प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदी मावळचे बाबूराव वायकर, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतिपदी हवेली तालुक्यातील पूजा पारगे तर समाजकल्याण सभापतिपदी दौंड तालुक्यातील सारिका पानसरे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मला पानसरे, तर उपाध्यक्षपदी रणजीत शिवतरे यांची ११ जानेवारी रोजी निवड करण्यात आली. तर विषय समितीच्या सभापतींच्या निवडीसाठी शुक्रवारी (ता. २४) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासन अधिकारी म्हणून हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी काम पाहिले. निवडीनंतर अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी समितीनिहाय कामकाजाचे वाटप केले.
राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी होणार का, अशी चर्चा मागील आठ दिवसांपासून रंगली होती. त्यामुळे शिवसेना आणि कॉँग्रेसमधील इच्छुकांनी मोर्चे बांधणी केली होती. प्रत्यक्ष निवडीचा दिवस उजाडल्यावर राष्ट्रवादीकडून चारही उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात महाविकास आघाडीला संधी दिली नसल्याचे दिसून आले.
परिणामी शिवसेना आणि भाजपने यांनी युती करत चारही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात बांधकाम व आरोग्य सभापती पदासाठी गुलाब पारखे, कृषी व पशुसंवर्धन सभापती पदासाठी दिलीप यादव, समाज कल्याण सभापती पदासाठी शैलजा खंडागळे, तर महिला बालकल्याण सभापती पदासाठी भाजपच्या वंदना कोद्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दुपारी तीन वाजता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. छाननीनंतर सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. खंडागळे, यादव, पारखे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. मुदतीत माघारी अर्ज सादर न झाल्याने महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी सारिका पानसरे, भाजपच्या कोद्रे यांच्यात निवडणूक झाली. सभागृहात उपस्थित सदस्यांनी हात वर करून पुजा पारगे यांची बहुमताने निवड केली.