पुणे बाजार समिती आज, उद्या बंद

Pune Market Committee closed today, tomorrow
Pune Market Committee closed today, tomorrow

पुणे ः ‘कोरोना’चा फैलाव रोखण्याबरोबरच खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पुणे बाजार समिती आज (शुक्रवारी) आणि शनिवारी (ता. २१) बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तर फुलबाजार रविवार (ता. २२) पर्यंत बंद राहणार आहे.  

बाजार समितीमधील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील आठवड्यापासून प्रत्येक बुधवारी व शनिवारी ३१ मार्चपर्यंत साप्ताहिक सुट्टी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन सुट्ट्यांदिवशी संपूर्ण बाजार स्वच्छतेकरिता बंद राहणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी माहिती दिली. 

अडते असोसिएशनचे विलास भुजबळ, कामगार युनियनचे संतोष नागंरे, संपत धोंडे, अनंता कोडले, सुधीर जाधव, अजय घुले, युवराज काची, राजू भालेराव, सचिन पायगुडे, नाथ खैरे उपस्थित होते. फुलबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मार्केट यार्ड फुलबाजार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली. दरम्यान, गूळ भुसार विभाग साप्ताहिक सुट्टी वगळता (रविवार) सुरळीत सुरू राहणार असल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी सांगितले.

बाजार समिती नियमीत सुरू राहणार ः प्रशासक बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख म्हणाले, बाजारातील घटकांनी बंदचा निर्णय घेतला असला, तरी बाजार समिती नियमित चालू ठेवणार आहे. शेतकऱ्यांनी माल घेऊन यावे व खरेदीदारांनी खरेदीसाठी यावे. शेतकऱ्यांना वजन काटा व बाकी लागणारे साहित्य बाजार समिती उपलब्ध करून देईल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com