Pune Bazar Samiti : पुणे बाजार समितीची आरक्षण सोडत जाहीर

Pune Market Committee releases reservation
Pune Market Committee releases reservation

पुणे ः विविध कारणांनी सातत्याने पुणे बाजार समितीची निवडणूक टाळण्यात आल्यानंतर आता उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी भाजप सरकारने शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्याच्या नियमानुसार गणांचे आरक्षण काढण्यात आले. यामधील १५ गणांपैकी ५ गणांवर आरक्षण निश्‍चित करण्यात आले. 

आरक्षणाची सोडत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत काढण्यात आली. यात गणनिहाय मतदार निश्‍चिती करण्यात येणार असून १२ फेब्रुवारी रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. 

दरम्यान, निवडणुकीची शेतकऱ्यांना मतदानाच्या हक्काची पद्धत रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून, लवकरच या बदलाचा वटहुकूम राज्य शासन काढण्याच्या तयारीत आहे. हा वटहुकूम निघाल्यास ही प्रक्रिया रद्द होणार आहे.

गण आणि आरक्षण पुढीलप्रमाणे
मुठा खुला 
माले खुला 
पौड खुला 
घोटावडे खुला 
पिरंगुट  खुला 
माण लवळे खुला 
पिंपरी-चिंचवड अनु.जाती, जमाती 
वाघोली- लोहगाव  खुला 
लोणीकंद पेरणे  महिला 
वाडेबोल्हाई - अष्टापूर खुला 
उरुळी कांचन  खुला 
लोणी काळभोर थेऊर खुला 
हडपसर मांजरी इतर मागासवर्ग 
खेड शिवापूर विमुक्त जाती व भटक्या जमाती 
खडकवासला खुला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com