agriculture news in marathi, pune market committee scurry to start online auction of pomegranate, pune, maharashtra | Agrowon

पुणे बाजारसमितीत डाळिंबाचे आॅनलाइन लिलाव सुरू करण्याची धावपळ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

ई-नाम अंतर्गत पुणे बाजार समितीमध्ये डाळिंबाचे आॅनलाइन लिलाव प्रायोगिक तत्त्वावर जून महिन्यापासून सुरू केले आहेत. तीन महिन्यांनंतर आता १०० टक्के लिलाव आॅनलाइन होणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत. 
- बी. जे. देशमुख, सचिव, पुणे बाजार समिती .

पुणे  ः केंद्र आणि राज्य सरकारचा प्राधान्यक्रम असलेल्या आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम)च्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय सचिवांनी कान टोचल्यानंतर पुणे बाजार समितीमध्ये डाळिंबाचे आॅनलाइन लिलाव सुरू करण्याची धावपळ सुरू झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार समोर येत असून, आॅनलाइन लिलावांमध्ये सहभागी होणार असाल तरच डाळिंब बाजारात आणा असा फतवाच बाजार समिती प्रशासनाने काढल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अडतेच ई- नामला विरोध करीत असल्याचेदेखील समोर येत आहे. 

दरम्यान, आॅनलाइन डाळिंब लिलाव प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज (सोमवार) आणि उद्या (मंगळवारी) पुणे बाजार समितीला भेट देणार आहे. यामुळे बाजार समितीने काही प्रमाणात डाळिंबाचे आॅनलाइन लिलाव सुरू केले आहेत. सोमवारी आणि मंगळवारी केंद्रीय समितीच्या दौऱ्यादरम्यान आवक जास्त होऊन, लिलाव प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणूनच शेतकऱ्यांना आॅनलाइन लिलावात सहभागी होणार नसाल तर शेतीमाल आणू नये असे सांगण्यात आल्याचीदेखील चर्चा बाजार समितीत आहे. 

राज्यातील ई-नामच्या अंमलबजावणीचा आढावा नुकताच केंद्रीय सचिवांनी पणन मंडळात झालेल्या बैठकीत घेतला. या वेळी पुणे आणि मुंबई बाजार समितीमधील ई-नामच्या अंमलबजावणीबाबत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय पथक सोमवारी (ता. ९) बाजार समितीमध्ये येत आहे. या समितीसमोर आॅनलाइन लिलावाचे प्रात्यक्षिक होणार आहे. या वेळी शेतकऱ्यांनी गोंधळ घालू नये यासाठी आॅनलाइन लिलाव करणार असाल तरच डाळिंब आणण्याचे फर्मान बाजार समितीने अडत्यांमार्फत शेतकऱ्यांना केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...