पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम

पुणे शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये देखील बाजार समितीत होणारी गर्दी नियंत्रणासाठी अखेर पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घातले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आता गर्दीवर नियंत्रण आणले जाणार आहे.
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम Pune market committee will be crowded
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम Pune market committee will be crowded

पुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये देखील बाजार समितीत होणारी गर्दी नियंत्रणासाठी अखेर पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घातले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आता गर्दीवर नियंत्रण आणले जाणार आहे. यासाठी करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये किरकोळ (घरगुती) खरेदीदारांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. घाऊक खरेदीदारांसाठी ओळखपत्रांची सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीत देखील बदल करण्यात आला असून, सोमवारपासून (ता.१९) १ मेपर्यंत शिवनेरी रस्ता सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

 बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणासाठी सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार किरकोळ खरेदीदारांना बाजारात प्रवेश देण्यात येणार नाही, तसेच बाजारातील अडते, व्यापारी, कामगार वाहनचालक, घाऊक खरेदीदारांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही बाजारात प्रवेश मिळणार नाही. असे ठरविण्यात आले.  

वाहतुकीत देखील बदल करण्यात आले असून, बाजार आवारातील बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील प्रवेशद्वार क्रमांक सातमधून टेंपो चालकांना प्रवेश देण्यात येणार असून, प्रवेशद्वार क्रमांक एकमधून त्यांना बाहेर पडता येणार आहे. सोमवारी पहाटे शिवनेरी रस्ता शेतीमाल वगळता अन्य वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

 असा आहे वाहतुकीतील बदल  वाहतूक बंद रस्ता : वखार महामंडळ ते उत्सव हॉटेल हा शिवनेरी रस्ता दुतर्फा बंद असणार आहे. बाजार आवारातील ठोक खरेदी चालू असल्याने त्याकरिता येणाऱ्या वाहनांसाठी केळी बाजाराच्या गेटमधून प्रवेश देण्यात येणार आहे. त्या वाहनांनी बाहेर पडण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडून उजवीकडे वखार महामंडळ चौक व डावीकडे बाजार समिती (उत्सव हॉटेल) येथून इच्छितस्थळी जावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com