Agriculture news in marathi The Pune Market Committee will continue in a circular manner | Agrowon

पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू राहणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 एप्रिल 2021

टाळेबंदीतही बाजार समितीमधील गर्दी कमी होत नसल्याने आता, बाजारातील गाळे आज, बुधवारपासून (ता.२१) ते ३० एप्रिलपर्यंत चक्राकार पद्धतीने (एक दिवसाआड) सुरू ठेवण्यात येणार आहे.

पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे सुरू असलेल्‍या टाळेबंदीतही बाजार समितीमधील गर्दी कमी होत नसल्याने आता, बाजारातील गाळे आज, बुधवारपासून (ता.२१) ते ३० एप्रिलपर्यंत चक्राकार पद्धतीने (एक दिवसाआड) सुरू ठेवण्यात येणार आहे.

पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह बाजार आवाराला भेट देत गर्दी नियंत्रणाबाबत पाहणी केली. या वेळी विविध सूचना करण्यात आल्या. गर्दीवर नियंत्रण न मिळविल्यास बाजार समिती बंदचा देखील इशारा गुप्ता यांनी दिला आहे. 

कोरोना टाळेबंदीमध्ये गर्दी नियंत्रणासाठी बाजार समितीने विविध उपाययोजना केल्या. मात्र गर्दी काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र काही त्रुटींमुळे गर्दी होतच होती. त्यामुळे पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सोमवारी (ता. १९) बाजार आवाराला भेट देत पाहणी केली. या वेळी बाजार आवार एक दिवसाआड सुरू ठेवता येईल का? यावर चर्चा होऊन, संपूर्ण बाजार आवार बंद न करता गर्दी नियंत्रणासाठी एक दिवसाआड एक गाळा सुरू ठेवत चक्राकार पद्धतीने बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

असा सुरू राहील बाजार 
वर्तुळाकार असलेल्या बाजार आवारात गणपती मंदिराकडे तोंड असलेले गाळे बुधवारी (ता.२१) तर दुसऱ्या दिवशी त्याच्या विरुद्ध असलेले संरक्षक भिंतींच्या दिशेला तोंड असलेले गाळे सुरू असतील.
 


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...