पुण्यात हिरवी मिरची, घेवड्याच्या दरात सुधारणा

Pune Market in green chilli and ghevda rete hike
Pune Market in green chilli and ghevda rete hike

पुणे : ढगाळ वातावरण निवळून थंडी पडण्यास सुरुवात झाल्याने पुणे मार्केट यार्डात रविवारी (ता. २९) मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने शेवगा, पावटा आणि वांग्यांच्या दरात दहा टक्क्यांनी घट झाली. तर मागणी वाढल्याने हिरवी मिरची व घेवड्याचे दर वधारले आहेत. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले आहेत. स्थानिक भागातून ओल्या तर गुजरात येथून वाळलेल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू झाली आहे. तसेच फळभाज्यांची आवक घटली आहे.

रविवारी येथील बाजारात १५० ते १६० गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून चार टेम्पो शेवगा, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी तीन ते चार ट्रक, कर्नाटक येथून तीन ते चार टेम्पो घेवडा, मध्य प्रदेशातून तीस ट्रक मटार, राजस्थान सात ते आठ ट्रक गाजर, गुजरात येथून शंभर पोती भुईमूग शेंग, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडे पाच ते सहा हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले एक हजार ते १२०० पोती, टोमॅटो साडे पाच ते सहा हजार पेटी, हिरवी मिरची तीन ते चार टेम्पो, भेंडी दहा ते बारा टेम्पो, गवार आठ ते दहा टेम्पो, फ्लॉवर दहा ते पंधरा टेम्पो, कोबी आठ ते दहा टेम्पो, वांगी दहा ते बारा टेम्पो, ढोबळी मिरची आठ ते दहा टेम्पो, ओली भुईमूग शेंग ५० ते ६० पोती, पावटा सात ते आठ टेम्पो, तांबडा भोपळाची दहा ते बारा टेम्पो, कांदा १५० ट्रक, आग्रा, इंदौर, तळेगाव येथून मिळून बटाट्याची ४५ ट्रक इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव

कांदा : ५००-७५०, बटाटा : १८०-२२०, लसूण : १०००-१६००, आले : सातारी २५०-४५०, भेंडी : २००-३००, गवार : ४००-५००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१४०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी १८०-२००, पापडी : २००-२२०, पडवळ : १५०-१६०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : ६०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : १२००-१३००, गाजर : २००-२५०, वालवर : २००-२२०, बीट : १४०-१५०, घेवडा : ३५०-४५०, कोहळा : १००-१५०, अर्वी : ३००-३५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-६५०, मटार : परराज्य : २५०-३००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

कलिंगड, खरबूज, पेरू झाले स्वस्त  गुलटेकडी मार्केट यार्डातील फळविभागात रविवारी सर्व प्रकारच्या फळांची आवक वाढली. थंडीमुळे कलिंगड तसेच पपईच्या गोडीवर परिणाम होत असल्याने या फळांना मागणी घटली आहे. परिणामी, गेल्या आठवड्याच्या तुलनेत भावात किलोमागे तीन ते पाच रुपयांनी घट झाली आहे. लिंबाच्या आवकेत दुपटीने वाढ झाल्याने गोणीमागे वीस रुपयांनी घट झाली आहे. याखेरीज ढगाळ हवामानामुळे आवक वाढल्याने पेरूच्या भावातही क्रेटमागे ५० रुपयांनी घसरण झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असल्याने भाव स्थिर आहेत. रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस पाच ट्रक, मोसंबी चाळीस टन, संत्री दोन टन, डाळिंब २०० ते २२५ टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे सहा ते सात हजार गोणी, पेरू दोन हजार क्रेटस्, चिक्कू एक ते दीड हजार डाग, कलिंगड दहा ते पंधरा टेम्पो, सफरचंद बारा हजार बॉक्स, सीताफळ सहा ते सात टन, बोरे दोन ते अडीच हजार पोती, द्राक्षे तीन टन, खरबुजाची सात ते आठ टेम्पो आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ५०-१२०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १२०-२८०, (४ डझन ) : ४०-१००, संत्रा : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन) : १००-१५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : १०-७०, गणेश : ५-२०, आरक्ता ५-३०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३०, पपई : ३-१५, चिक्कू : १००-५००, पेरू : १५०-४५०, सीताफळ : ३०-१२५, सफरचंद : सिमला (२५ ते ३० किलो) २०००-२५००, किन्नोर : २४००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ८००-१४००. बोरे (१० किलो) : चेकनट : ३५०-४५०, उमराण : ३०-५०, चमेली : ६०-१००, चण्यामण्या : ३५०-४००. द्राक्षे : जम्बो (१० किलो) ५००-१०००, तासगणेश (१५ किलो) : ७००-१२००.

पालेभाज्यांच्या भावात घसरण मार्केट यार्डात बहुतांश पालेभाज्यांची आवक वाढली आहे. बाजारात कोथिंबीर, हरभरा वगळता सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने भावात शेकडा जुडीमागे शंभर ते तीनशे रुपयांनी घट झाली आहे. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे हरभरा व कोथिंबिरीचे भाव स्थिर राहिले आहेत. येथील बाजारात रविवारी कोथिंबिरीची दोन लाख जुड्यांची, तर मेथीची पावणे दोन लाख जुड्यांची आवक झाली. तसेच, हरभऱ्याच्या २५ हजार गड्डींची आवक झाली. कोथिंबिरीला घाऊक बाजारात २ ते ५ रुपये भाव मिळत असून, किरकोळ बाजारात पाच ते दहा रुपये भावाने विक्री होत आहे. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २००-५००, मेथी : २००-४००, शेपू : ३००-५००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : ५००-७००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ५००-८००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ४००-६००, चुका : ५००-८००, चवळई : ४००-६००, पालक : ४००-५००, हरभरा गड्डी : ५००-८००.

फुलांच्या भावात घसरण मार्केट यार्डातील फूलबाजारात फुलांची साधारण आवक होत आहे. वर्षअखेर असल्याने सर्व प्रकारच्या फुलांच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी, गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी घट झाली आहे. पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : २०-५०, बिजली : २०-४०, कापरी : १०-२०, शेवंती : २०-४०, अ‍ॅस्टर : ३-६, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, ग्लॅडिएटर : १०-२०, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, लिली बंडल : ६-१०,  जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ५०-८०.

पापलेट, हलवा, कोळंबी, रावस महागला मार्गशीर्ष महिना संपल्याने गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीला मागणी वाढली आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने पापलेट, हलवा, कोळंबी, रावसच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर अन्य मासळींचे भाव टिकून आहेत. थंडीची चाहूल लागल्याने अंडी, चिकनला मागणी होत आहे. परिणामी, चिकनच्या भावात किलोमागे दहा रुपयांनी वाढ झाली आहे. तर, इंग्लिश अंडी शेकड्यामागे ३५ ते ४० रुपये तर गावरान अंडीचे दर २० रुपयांनी वधारले आहे. मटणाचे भाव टिकून असल्याचे सांगण्यात आले.

मासळी बाजार रविवारी खोल समुद्रातील मासळीची दहा ते बारा टन, खाडी दोनशे ते चारशे किलो तर नदीच्या मासळीची एक ते दीड टन इतकी आवक झाली. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून दहा ते बारा टन आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)  पापलेट : कापरी : १५००, मोठे १५००, मध्यम : ८००-९००, लहान ७००-८००, भिला : ५५०, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ४८०, रावस : ५५०-७५०, घोळ : ६००, भिंग : २८०, करली : २४०-२८०, करंदी : ३६०, पाला : ७००-१२००, वाम : पिवळी ५४०-८००, काळी : ३६०-४००, ओले बोंबील : १२०-१६०

कोळंबी  २८०-५५०, जंबोप्रॉन्स : १५००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : २४०-४४०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : १६०-१८०, खेकडे : २००-२८०, चिंबोऱ्या : ५५०

खाडीची मासळी सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : ३६०-७००, तांबोशी : ४००, पालू : २८०, लेपा : १४०-२४०, शेवटे : २००, बांगडा : १६०-२४०, पेडवी : १००, बेळुंजी : १४०, तिसऱ्या : १८०, खुबे : १६०,  तारली : १४०-१६०. नदीची मासळी : रहू : १४०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २८०, खवली : २४०, आम्ळी : १६०, खेकडे : २४०, वाम : ५५०. 

मटण  बोकडाचे : ५६०, बोल्हाईचे : ५६०, खिमा : ५६०, कलेजी : ६२०. चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 

अंडी गावरान : शेकडा : ८५० डझन : १२० प्रति नग : १०. 

इंग्लिश : शेकडा : ५०५ डझन : ६५ प्रतिनग : ५.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com