agriculture news in marathi, pune milk sangh got NDDB rating, Maharashtra | Agrowon

पुणे दूध संघाला ‘एनडीडीबी’चे मानांकन

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 जुलै 2018

पुणे ः भेसळयुक्त दूध विक्रीला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बाेर्डाच्या (एनडीडीबी) वतीने देण्यात येणारे क्वॉलिटी मार्कचे मानांकन पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (कात्रज दूध) उत्पादनांना मिळाले आहे. मानांकनाचे प्रमाणपत्र ‘एनडीडीबी’चे प्रादेशिक विभागाचे प्रमुख अनिल हातेकर यांनी शुक्रवारी (ता. २०) संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांना प्रदान केले.
 

मानांकन मिळालेले पुणे जिल्हा संघ पहिला असून, राजाराम बापू संघाला देखील हे मानांकन मिळाले असून, राज्यातील आणखी सात संघांनी अर्ज दाखल केले आहेत. 

पुणे ः भेसळयुक्त दूध विक्रीला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बाेर्डाच्या (एनडीडीबी) वतीने देण्यात येणारे क्वॉलिटी मार्कचे मानांकन पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (कात्रज दूध) उत्पादनांना मिळाले आहे. मानांकनाचे प्रमाणपत्र ‘एनडीडीबी’चे प्रादेशिक विभागाचे प्रमुख अनिल हातेकर यांनी शुक्रवारी (ता. २०) संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांना प्रदान केले.
 

मानांकन मिळालेले पुणे जिल्हा संघ पहिला असून, राजाराम बापू संघाला देखील हे मानांकन मिळाले असून, राज्यातील आणखी सात संघांनी अर्ज दाखल केले आहेत. 

या मानांकनाबाबतची माहिती देताना ‘एनडीडीबी’चे प्रादेशिक विभागप्रमुख अनिल हातेकर म्हणाले, की देशभरात दूध भेसळीचा गंभीर प्रश्‍न बनला आहे. फुड सेफ्टी स्टॅंडर्डचे आयएसआे असतानादेखील भेसळयुक्त दूध आढळून येत आहे. यामुळे डेअरी विकास बाेर्डाने गेल्या तीन वर्षांपासून क्वाॅलिटी मार्क देण्याचे जाहीर केले. यानुसार महाराष्ट्रातील सात संघानी अर्ज केले हाेते. त्यानुसार विविध संघाची पाहणी करण्यात आली. या वेळी मशिनरीमध्ये काही बदल आम्ही सुचवले हाेते.

त्यानुसार पुणे जिल्हा दूध संघाने बदल केले. त्यानंतर या संघाच्या उत्पादनांना क्वाॅलिटी मार्क मानांकन देण्यात आले आहे. हे मानांकन दिल्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी आम्ही अचानक भेट देऊन उत्पादनांचा दर्जा तपासणार आहाेत. या तपासणींमध्ये दर्जा खालावलेला असल्यास मानांकन रद्द करण्यात येणार आहे. तर प्रत्येक तीन वर्षांनी नव्याने मानांकन घ्यावे लागणार आहे. 

दूध संघाचे अध्यक्ष हिंगे म्हणाले, की कात्रज दूध संघाच्या विविध १२१ उत्पानांचा दर्जा राखण्यासाठी १४७ प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात. यासाठी संघाला आयएसआे २००५ मिळाले असून, २०१५ साठी आम्ही अर्ज दाखल केला आहे. उत्पादनांचा दर्जा राखण्यासाठीच्या विविध उपाययाेजनांमुळे आम्हाला ‘एनडीडीबी’च्या क्वॉलीटी मार्कचे मानांकन मिळाले आहे. या मानांकनाचा लाेगाे आम्ही सर्व उत्पादनांवर लावल्यामुळे विपणनासाठी अधिक फायदा हाेणार आहे.
भविष्यात मनुष्यरहित स्वंयचलीत प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे. या वेळी संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षिरसागर यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित हाेते. 


इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...