Agriculture news in Marathi, Pune, Mumbai Market Committees elections soon | Agrowon

पुणे, मुंबई बाजार समित्यांच्या निवडणुका लवकरच 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

पुणे ः राज्यातील बदललेल्या सत्तासमीकरणांमुळे बाजार समित्यांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तेतील सहभागामुळे त्यांच्याशी संबधित कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि पुणे या राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचा समावेश आहे. या दोन्ही बाजार समित्यांवर सध्या प्रशासकीय राजवट असली तरी, या समित्यांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. 

पुणे ः राज्यातील बदललेल्या सत्तासमीकरणांमुळे बाजार समित्यांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तेतील सहभागामुळे त्यांच्याशी संबधित कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि पुणे या राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचा समावेश आहे. या दोन्ही बाजार समित्यांवर सध्या प्रशासकीय राजवट असली तरी, या समित्यांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. 

बाजार समित्या ही महत्त्वाची आर्थिक सत्ता केंद्र आहेत. यामध्ये मुंबई व पुणे बाजार समित्या या राज्यातील सर्वांत मोठ्या बाजार समित्या आहेत. पुणे बाजार समितीमधील आर्थिक गैरव्यवहारांमुळे २००३ मध्ये संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. तर मुंबई बाजार समितीमधील एफएसआय घोटाळा आणि इतर विविध गैरव्यवहारांमुळे २००५ साली संचालक मंडळ बरखास्त करुन, संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पणन संचालकांनी दिले आहेत. मात्र, ही प्रक्रिया सध्या न्यायप्रविष्ट असून, या दोन्ही बाजार समित्यांवर प्रशासकीय राजवट आहे. 

महायुतीच्या सरकारने सहकार क्षेत्रात चंचुप्रवेशासाठी पुणे बाजार समितीवर भाजपा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. मात्र, हे मंडळ अल्प काळ टिकले. दरम्यान या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबत जनहित याचिका दाखल असून, उच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश फडणवीस सरकारला दिले होते. मात्र, विविध कारणांनी निवडणुका टाळण्यात आल्या. या बाबत पुणे बाजार समितीचे माजी संचालक आणि आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी निवडणूक लागल्यास आम्ही लढायला तयार असल्याचे सांगितले. तर मुंबई बाजार समितीमधील आडते संघटनेचे अध्यक्ष संजय पानसरे यांनी ही निवडणुकीबाबत इच्छा व्यक्त केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
`गोवर-रुबेला'त सोलापूर जिल्ह्यात...सोलापूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गोवर-...
सांगली जिल्ह्यात शेत, पाणंद रस्त्यांचे...लेंगरे, जि. सांगली : शेत आणि पाणंद रस्त्यांचे...
पाणीवाटप संस्थेद्वारे मिळणार ‘ताकारी’चे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ...
मका संशोधन केंद्राचे भिजत घोंगडेऔरंगाबाद : कार्यकारी परिषदेच्या ठरावानंतर...