पुण्यात मागणीअभावी दर कोसळले

खरिपातील भाजीपाल्याचे उत्पादन सुरळीत सुरू झाल्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. मात्र, मागणी अभावी विविध भाजीपाल्यांचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
पुण्यात मागणीअभावी दर कोसळले In Pune, rates fell due to lack of demand
पुण्यात मागणीअभावी दर कोसळले In Pune, rates fell due to lack of demand

पुणे : खरिपातील भाजीपाल्याचे उत्पादन सुरळीत सुरू झाल्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. मात्र, मागणी अभावी विविध भाजीपाल्यांचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विविध भाजीपाल्यांमध्ये प्रामुख्याने टोमॅटोसह इतर पालेभाज्यांचा समावेश आहे.  पिकांच्या दराबाबत बोलताना किसन चव्हाण (रा. वडज, ता.जुन्नर) म्हणाले, ‘‘माझी टोमॅटो, चवळी आणि फरस बीची प्रत्येकी अर्धा एकर लागवड आहे. सध्या टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला ३० ते १५० (प्रति किलो ३ ते ७ रुपये) चवळी आणि फरस बीला १० किलोला १५० ते २०० (प्रति किलो १५ ते २०) दर मिळत आहेत. हे दर अतिशय कमी असून, उत्पादन खर्च देखील निघत नाही. टोमॅटोचे दर कमीत कमी प्रति किलोला १५ रुपये मिळाले तर कुठे चांगला फायदा होतो.’’ कुसूर (ता. जुन्नर) येथील दोडका उत्पादक शेतकरी तुषार ताजणे म्हणाले, ‘‘माझी दोडका सध्या सुरू असून, १४ ते १५ रुपये प्रति किलोला दर मिळत आहे. हे दर फारच कमी असून, किमान २० ते २५ रुपये दर अपेक्षित आहे.’’   दरम्यान, पुणे जिल्ह्यातील टोमॅटोची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात शुक्रवारी (ता.२७) टोमॅटोची सुमारे २२ हजार क्रेटची आवक झाली होती. या वेळी २० किलोच्या क्रेटला ४० ते १३० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीचे उपसचिव शरद धोंगडे यांनी सांगितले. तर सध्या सर्वच भागातील उत्पादन सुरू झाल्याने आवक असल्याने दर कमी असल्याचे धोंगडे म्हणाले.  नारायणगाव उपबाजारातील  शुक्रवारचे (ता.२७)  प्रति १० किलोचे दर

  • फ्लॉवर    ३०-१४५
  • कोबी    १०-३५
  • काकडी    ३०-१४७
  • भेंडी    ५०-१५५
  • गवार    ५०-३०० 
  • घोसावळे    २०-१२५
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com