पुष्प प्रदर्शनात २५० हून अधिक गुलाब !

पुष्प प्रदर्शनात २५० हून अधिक 
गुलाबांच्या जातींचे सादरीकरण 


पुणे : 'दि रोझ सोसायटी ऑफ पुणे'च्या वतीने दरवर्षी आयाेजित करण्यात आलेल्या १००व्या पावसाळी गुलाब पुष्प प्रदर्शनाला शनिवार (ता.१६) पासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्रारंभ झाला. या प्रदर्शनात भारतातून २५० हून अधिक गुलाबांचे सादरीकरण करण्यात आले आहे. या वेळी विविधरंगी गुलाबांचे साैंदर्य पाहण्यासाठी गुलाब प्रेमींनी गर्दी केली हाेती. प्रदर्शनात विविध जातींच्या गुलाबांसह विविध पुष्परचनादेखील सादर करण्यात आल्या आहेत. प्रदर्शनादरम्यान बागांसाठी विविध शाेभिवंत राेपांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये विविधारंगी फुल झाडांचे सादरीकरण करण्यात आले असून, विक्रीसाठी देखील उपलब्ध आहेत. यामध्ये विविधारंगी कॅकटस प्रदर्शनाचे आकर्षण ठरले असून, अनेक नागरीक उत्सुकतेने खरेदी करत आहेत. तसेच बागकामांबराेबरच सजावटीसाठी लागणारे साहित्य, रोपासाठी खते, बी-बियाणे व औषधे, तसेच रोपे लागवडीसाठी लागणारी अवजारेदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

प्रदर्शनाच्या निमित्ताने केवळ गुलाबशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुष्पसंशाेधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद रविवारी (ता. १७) सकाळी ९ वाजता गुलाब लागवडीसाठी व उत्पादनवाढीसाठी लागणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रदर्शनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारिताेषिक वितरण रविवारी संध्याकाळी सात वाजता डॉ. के. व्ही. प्रसाद यांच्या हस्ते हाेणार आहे. प्रदर्शन रविवारी (ता. १७) सकाळी ९ ते रात्री ८.०० वाजेपर्यंत असणार आहे. 

प्रदर्शनाचे उद्‍घाटन सीटीआर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी 'राेझ शाे'चे अध्यक्ष अरुण पाटील, राेझ साेसायटीचे अध्यक्ष रवींद्र भिडे, सचिव भाग्यश्री टकले, विजय पाेकर्णा आदी मान्यवर उपस्थित हाेते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com