पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिर

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ५) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक, मागणी आणि दर स्थिर होते.
Pune saw an increase in vegetable arrivals; Rate fixed
Pune saw an increase in vegetable arrivals; Rate fixed

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ५) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक, मागणी आणि दर स्थिर होते.

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून १० टेम्पो गाजर, कर्नाटक गुजरात येथून ३ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून घेवडा २ टेम्पो आणि तोतापुरी कैरी २०० गोणी, हिमाचल प्रदेशातून ५ ट्रक मटार आग्रा येथून २७ ट्रक, तर इंदूर येथून ६ टेम्पो बटाटा तर गुजरात आणि मध्य प्रदेशातून लसूण ८ ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले ६०० गोणी, कोबी ४ टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो सुमारे ५०० क्रेट, फ्लॉवर ६ टेम्पो, सिमला मिरची ८ टेम्पो, भुईमूग सुमारे १०० गोणी, तांबडा भोपळा ८ टेम्पो, कांदा सुमारे ५० ट्रक आवक झाली होती; तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सव्वा लाख तर मेथीच्या ४० हजार जुड्या आवक झाली होती.

फळभाज्यांचे १० किलोचे दर पुढीलप्रमाणे कांदा - ७०-९०, बटाटा -२००-२३०, लसूण - ५००-८००, आले सातारी - २५०-४००, भेंडी १००-१५०, गवार - गावरान, सुरती - १५०-२५०, टोमॅटो -१५०-२००, दोडका २००-२५०, हिरवी मिरची - १८०-३००, दुधी भोपळा - १००-१२०, चवळी -१००-१५०, काकडी -१००-१५०, कारली हिरवी - २००-२५०, पांढरी -१८०-२००, पापडी - १००-१२०, पडवळ -२००-२५०, फ्लॉवर १००-१४०, कोबी -७०-८०, वांगी - १००-२००, डिंगरी - १००-१४०, नवलकोल - ६०-८०, ढोबळी मिरची - ३००-३५०, तोंडली- कळी २००-२५०, जाड -९०-१००, शेवगा -३५०-४००, गाजर - इंदौर -१२०-१६०, वालवर - २००-२२०, बीट १६०-२००, घेवडा -३००-४००, कोहळा १००-१२०, आर्वी -२५०-३००, घोसावळे १२०-१८०, मटार परराज्य - ६००-७५०, पावटा ५५०-६००, तांबडा भोपळा - ४०-८०, कैरी तोतापुरी - ३००-३५०, सुरण -१८०-२००, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१००

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर कोथिंबीर - ५००-१०००, मेथी ३००-११००, शेपू ६००-८०० कांदापात ७००-८००, चाकवत ५००-६००, करडई -५००-६००, पुदिना - ३००-४००, अंबाडी -५००-६००, मुळे ८००-१०००, राजगिरा - ५००-६००, चुका ५००-६००, चवळई -५००-६००, पालक ५००-६००.

फुलबाजार फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ४०-७०, गुलछडी : १५-५०, कापरी : २०-५०, शेवंती : ३०-६०, अ‍ॅस्टर : २०-३०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, लिली बंडल : ३-६, जर्बेरा : १०-२०, मोगरा : १५०-२५०.जुई -१५०-२५०.

फळांचा बाजार रविवारी (ता. ५) येथील फळबाजारात संत्री ४ टन, तर मोसंबी सुमारे २२ टन, डाळिंब सुमारे ६० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे तीन हजार गोणी, पेरू २०० क्रेटस्, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज ४ टेम्पो आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ६०-१४०, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ८०-२००, संत्रा : (किलो) : ३५-९५, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : २०-१००, गणेश : ५-२०, आरक्ता १०-३५. कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-३०, पपई : ५-२०, पेरू : २००-३००. सिताफळ -१५ -१४०

मटण (प्रतिकिलो) : बोकडाचे : ६००, बोलाईचे : ६००, खिमा : ६०० : कलेजी : ६४०. चिकन (प्रतिकिलो) : चिकन : १८०, लेगपीस : २१०, बोनलेस : २८०, जिवंत कोंबडी : १५०. गावरान अंडी : शेकडा : ७५०, डझन : ९६, प्रतिनग ८. इंग्लिश अंडी : शेकडा : ३८०, डझन : ५४, प्रतिनग ४.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com