पुण्यात सिमला, हिरवी मिरचीच्या दरात सुधारणा

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक आणि मागणी स्थिर राहिल्याने विविध भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.
Pune in Simla, green chilli price improvement
Pune in Simla, green chilli price improvement

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक आणि मागणी स्थिर राहिल्याने विविध भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. मात्र, सिमला आणि हिरवी मिरचीसह दोडक्याच्या दरात वाढ झाली होती. तर थंडीमुळे लिंबाची आवक निम्म्याने घटल्याने दरात वाढ झाली होती. 

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ८ टेम्पो हिरवी मिरची, उत्तर प्रदेशमधून कोबी ४ टेम्पो, मध्यप्रदेश २५ ट्रक मटार, आंध्रप्रदेशातून शेवगा १०० गोणी, राजस्थान येथून १५ ट्रक गाजर, तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे १० ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ४०० गोणी, टोमॅटो सुमारे १० हजार क्रेट, कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर सुमारे १० टेम्पो, सिमला मिरची ८ टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा सुमारे ८० ट्रक, आग्रा, इंदूर आणि स्थानिक बटाटा सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे १० किलोचे भाव  कांदा : २००-२८०, बटाटा ८०-१४०, लसूण : १००-३००, आले : सातारी १००-१५०, भेंडी : ५००-७००, गवार : ७००-८००, टोमॅटो : १५०-२००, दोडका : ४५०-५००, हिरवी मिरची : ७००-८००, दुधी भोपळा: १५०-२५०, चवळी: ५००- ५५०, काकडी : १००-१२०, कारली हिरवी ३५०-४००, पांढरी २००-२५०, पापडी : ३००-३५०, पडवळ: २८०-३००, फ्लॉवर: १५०-१६०, कोबी : २००-२५०, वांगी : ४००-५५०, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : १५०-१८०, ढोबळी मिरची: ६००-७००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड, २००-२२०, शेवगा : १२००  गाजर १५०-१८०, वालवर २००-२५०, बीट: २००-२५०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे: २५०-३००, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार : परराज्य -२४०-२८० पावटा : ६००-६५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण: १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ : शेकडा १०००-१६००. 

फळबाजारात रविवारी (ता. १६) लिंबाची अवघी सुमारे १ हजार गोणी, डाळिंब आणि मोसंबी प्रत्येकी सुमारे ३० टन, संत्रा २० टन, पपई १० टेम्पो, चिक्कू १ हजार गोणी, पेरूची सुमारे ५०० क्रेट, सीताफळ सुमारे ३ टन, कलिंगड ४ टेम्पो, खरबूज २ टेम्पो, स्ट्रॉबेरीची सुमारे १० टन, विविध बोरांची सुमारे ३५० गोणी आणि द्राक्षांची सुमारे १५ टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : ३००-४००, मोसंबी : (३ डझन) : ३२०-६००, (४ डझन) : १७० -३४०, संत्रा : (१०किलो) : ३००-७००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ६०-१२०, गणेश : १०-४०, आरक्ता २०-८०, कलिंगड : १०-१४, खरबूज : २०-३० पपई : ८-१४, चिक्कू (१० किलो) २००-५००, पेरू (२० किलो): ३००-५००, सीताफळ १०-८०. बोरे (प्रति १० किलोचे दर) - चण्यामण्या ८००-९००, चेकनट ९००-१०००, उमराण ८०-१२०, चमेली ४००-५५०. द्राक्षे - जम्बो (१० किलो) - ४००-१०००, सोनाका ४५०-९००, माणिकचमण -२००-४५०. स्ट्रॉबेरी (प्रति किलो) - ५०-८०

फुलबाजार फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : फुलबाजारात आवक आणि दर स्थिर होते. झेंडू : ३०-६०, गुलछडी : ८०-१२०, अष्टर : जुडी १०-१६, कापरी : ३०-६०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जर्बेरा : २०-३०, कार्नेशियन : ६०-१००, शेवंती काडी ५०-१२०.

मटण मासळी  गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १६) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १२ टन, खाडीतील मासळीची सुमारे ५०० किलो, नदीतील मासळीची १ टन, तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १५ टन आवक झाली होती. खोल समुद्रातील मासळीची आवक कमी झाली आहे. सर्व प्रकारच्या मासळीच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तर चिकन, मटण, अंड्यांचे दर स्थिर आहेत.  

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १४००-१८००, मोठे- १२००-१४०० मध्यम : ९५०-११५०, लहान ७५०-९५०, भिला : ६००-७००, हलवा : ५००-६५०, सुरमई : ४८०-६००, रावस : लहान ५५०-६५०, मोठा : ८००-९००, घोळ : ४८०-६००, करली : २४०-३२०, पाला : ७००-१४००, वाम : ८००-१०००, करंदी-४००-४८०, ओले बोंबील : १८०-२४०, भिंग-४००-४८०. कोळंबी : लहान १६०-२८०, मोठी-४४०-६५०, जंबोप्रॉन्स : १५००, किंगप्रॉन्स : ७००-९००, लॉबस्टर : १४५०, मोरी : २००-२८०, खेकडे : ३००-४४०. चिंबोऱ्या : ४४०-५५०, मांदेली-८०-१६०, राणीमासा-१६०-२००. 

खाडीची मासळी : सौंदाळे-३२०-४००, खापी-२४०-३२० नगली : ३६०-६५०, तांबोशी : ३००-४४०, पालू-२४०-३२०, बांगडा : लहान-१००-१६०, बांगडा मोठा-१८०-२४०, शेवटे २००-२८०, तिसऱ्या-२००-२८०, खुबे : १००-१४०, लेपा-१२०-२००, पेडवी-१००-१२०, वेळुंजी-१६०-२००, तारली-१८०-२००. 

नदीतील मासळी : रहू-१६०-२००, कतला-१६०-२००, मरळ-४८०-५५०, शिवडा-२००-२४०, खवली- २००-२४०, आम्ळी- १००-१६०, खेकडे- २००-२८०, वाम-५५०. 

मटण ः बोकडाचे ६८०, बोलाईचे- ६८० , खिमा-६८०, कलेजी-७००. 

चिकन ः चिकन ः २००, लेगपीस-२५०, जिवंत कोंबडी-१५०, बोनलेस-३००. 

अंडी : गावरान शेकडा ९३०, डझन १२०, प्रतिनगास १०. इंग्लिश शेकडा ५००, डझन ७२, प्रतिनगास ६.००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com