agriculture news in marathi Pune Sunday APMC Rate, Demand increases on Sankrant Bhogi for carrot and green peas | Agrowon

पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणी

ॲग्रोवन वृत्तसेवा 
सोमवार, 11 जानेवारी 2021

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पापडी, वांगी, गाजर, वालवर, भुईमूग शेंगा, मटार, पावटा यांच्या मागणीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १०) भाजीपाल्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. कोरोनानंतर सुरळीत झालेल्या बाजारपेठेतील तुलनेने सर्वाधिक आवक झाली होती. तर बुधवारी (ता. १३) साजऱ्या होणाऱ्या भोगी निमित्ताने पापडी, वांगी, गाजर, वालवर, भुईमूग शेंगा, मटार, पावटा यांच्या मागणीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 

परराज्यांतून आलेल्या आवकेमध्ये मध्यप्रदेशातून १५ ट्रक मटार, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ४ ट्रक, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, राजस्थानहून १० टेम्पो गाजर आणि मध्यप्रदेशातून लसणाची ५ ट्रक आवक झाली होती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार पोती, कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, गवार ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, टॉमेटो १० हजार क्रेट, कांदा नवीन आणि जुना सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर व स्थानिक भागांतून ३० ट्रक बटाटा आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव  
कांदा : २२०-३५०, बटाटा : १५०-२२०, लसूण : ५००-१०००, आले : सातारी १००-२००, भेंडी : २००-३००, गवार : ३००-३५०, टोमॅटो : ६०-८०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : ३००-३५०, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २००-२२०, पांढरी १५०-१६०, पापडी : २५०-३५०, पडवळ : २००-२२०, फ्लॉवर : ४०-६०, कोबी : ४०-६०, वांगी : २००-२५०, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ५०-६०, ढोबळी मिरची : २००- २५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : ५००-७००, गाजर : १०५-२००, वालवर : ३००-३५०, बीट : ४०-६०, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२२०, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : २००-२२०, पावटा : २५०-३००, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : १५०-२००, स्थानिक -२५०-३००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची एक लाख आणि हरभऱ्याच्या ५० हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २००-८००, मेथी : २००-७००, शेपू : ३००-६००, कांदापात : ७००-१०००, चाकवत : ३००-४००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ३००-५००, चुका : ३००-४००, चवळई : ३००-४००, पालक : ४००-६००, हरभरा गड्डी - ४००-७००. 

फळबाजार 
लिंबांची सुमारे २ हजार गोणी, संत्री १० आणि मोसंबी सुमारे ३५ टन, डाळिंब ४० टन, पपई २० टेम्पो, चिक्कू सुमारे १ हजार गोणी, कलिंगड सुमारे २५ आणि खरबूज सुमारे १५ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे ३५० गोणी  आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-४००, मोसंबी : (३ डझन) : ३००-५००, (४ डझन ) : १८०-२००, संत्रा : (१० किलो) : १००-३००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२५०, गणेश : २०-६०, आरक्ता २०-८०. कलिंगड : ३-७, खरबूज : १०-२५, पपई : ५-१५, चिक्कू (१० किलो): १००-६००, बोरे (१० किलो)- चमेली २२०-२५०, उमराण ५०-७०, चण्यामण्या ५५०-५८०, चेकनेट ५५०-६००. 

फुलबाजार 
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ५०-८०, ऑस्टर : जुडी १०-१२, सुट्टा ३०-६०, कापरी : २०-३०, शेवंती ५०-८०, गुलाबगड्डी : ३०-५०, गुलछडी काडी : २०-८०, डच गुलाब (२० नग) : ८०-१५०, जर्बेरा : ३०-५०. कार्नेशियन : ८०- १२०. शेवंती काडी -१५०-२५०, लिलीयन (१० काड्या) ८००-१३००, आॅर्चिड - १५०-३५०, ग्लॅडिओलस - (१० काड्या) - 
३०-६०.

मटण मासळी 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. १०) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीची सुमारे १०० किलो तर नदीच्या मासळीची दीड टन आवक झाली. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १४ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

देशासह राज्याच्या काही भागांमध्ये बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाच्या घटनांमुळे चिकनची मागणी कमी होऊ लागली आहे. परिणामी गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकनचे दर २० रुपयांनी घटले आहेत. तर अंडी, मटणाचे  दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश  परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली

खोल समुद्रातील मासळी  (प्रतिकिलोचे भाव) :

  • पापलेट : कापरी : १५००-१६०० मोठे १४००, मध्यम : १०००,  लहान ७००-८००, भिला : ६००, हलवा : ५५०, सुरमई : ५००-५५०, रावस : लहान ५५०,  मोठा : कट ७५०, घोळ : ६००, भिंग : ४००, करली : २८०, करंदी : सोललेली ४४०, पाला :  लहान  ७००-८००, मोठे : १२००-१४००, वाम :  लहान ५५०, मोठी ७००-७५०, ओले बोंबील : १६०-२००, 
  • कोळंबी ः लहान २८०, मध्यम : ४००-४८०, मोठे : ६००, जंबोप्रॉन्स : १२००,  किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १०००-१२००, मोरी : २८०, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २००, खेकडे  : लाल : २८०, चिंबोर्‍या : ६००. 
  • खाडीची मासळी : सौंदाळे : २४०-२८०, खापी : २४०-२८०, नगली : लहान ३६०, मोठी ६००-७००, तांबोशी :  ४००, पालू : २८०, लेपा : लहान १४०-१६० मोठे  २४०-२८०,  शेवटे : २४०, बांगडा : लहान २०० , मोठे : २८०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०  तिसऱ्या : २४०-२८०,  खुबे : १४०, तारली : २००, 
  • नदीची मासळी : रहू :१६० कतला :१६०, मरळ : ४००-४८०, शिवडा : २४०-२८०, खवली : २४०, आम्ळी :१६०, खेकडे : २००,वाम : ५५०
  • चिकन : चिकन : १८०, लेगपीस : २२० जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०. 
  • अंडी : गावरान : शेकडा : ८५० डझन : १२० प्रति नग : १०, इंग्लिश : शेकडा : ४९० डझन : ६६ प्रतिनग : ५. ५०
  • मटण : बोकडाचे : ६४० बोल्हाईचे : ६४० खिमा : ६४०, कलेजी : ६४०.  

 


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात घेवडा, भेंडी, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये तुरीला क्विंटलला सव्वा सहा... नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याचे दर स्थिर पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगलीत बेदाण्याला उच्चांकी २७१ रुपये दरसांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा...
खानदेशात कांदा दर स्थिरजळगाव ः खानदेशात मागील महिनाभरापासून कांदा दर...
औरंगाबादमध्ये द्राक्षांना क्विंटलला...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात हरभरा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात हरभरा दरात सुधारणा झाली असून, दर...
राज्यात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटललातुरात प्रतिक्विंटलला ७००० ते १२५०० रुपये...
खानदेशात केळी कमाल १०००, तर किमान दर...जळगाव : खानदेशात केळीची आवक कमी आहे. दुसरीकडे...
सोलापुरात हिरवी मिरची दरात सुधारणासोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये लाल कांदा दरात सुधारणा कायमनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
वाईत नवीन हळदीची आवक सुरू वाई, जि. सातारा ः येथील शेती उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत रविवारी (ता. १४)...
पुण्यात भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात द्राक्ष २५०० ते १५००० रुपयेजळगावात क्विंटलला ५००० ते ८००० रुपये जळगाव ः...