Agriculture News in Marathi In Pune, tomatoes, brinjals and sugarcane are booming | Agrowon

पुण्यात टोमॅटो, वांगी, शेवगा तेजीत 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.१०) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाच्या सुमारे ११० ट्रक आवक झाली होती.

पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.१०) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाच्या सुमारे ११० ट्रक आवक झाली होती. शनिवारचा (ता.९) साप्ताहिक बाजार बंद आणि सोमवारच्या (ता.११) महाराष्ट्र बंदमध्ये बाजार आवारातील संघटना सहभागी होणार असल्याने भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली होती. तर विविध भाजीपाल्यांची मागणी वाढल्याने टोमॅटो, वांगी, सिमला मिरची, शेवगा, गाजर यांच्या दरात वाढ झाली होती. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 

परराज्यांतून होणाऱ्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे २० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ४ टेम्पो, तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, इंदौर येथून गाजर ३ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा २ टेम्पो आणि २ टेम्पो रताळी, गुजरात येथून भुईमुगाच्या शेंगा २ टेम्पो तर मध्य प्रदेशातून लसणाची ८ ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ३०० पोती आवक झाली होती. गवार, भेंडी आणि कोबी प्रत्येकी ८ टेम्पो, सिमला मिरची, तांबडा भोपळा आणि फ्लॉवर प्रत्येकी १० टेम्पो, स्थानिक मटार २०० गोणी, टोमॅटो १० हजार क्रेट, तर जुन्या कांद्याची ७० तर नव्या कांद्याची ३० अशी एकूण सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ९० ट्रक आवक झाली होती. कराड, मलकापूर परिसरातून रताळ्याची सुमारे १ हजार गोणी आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : जुना - २५०-३५०, नवीन - १००-२००, बटाटा : १००-१४०, लसूण : २५०-७००, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान - ४००-६००, टोमॅटो : २५०-३५०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : १००-३००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२२०, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी १४०-१५०, पांढरी १००-१२०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : २००-२२०, कोबी : ६०-१००, वांगी : ४००-५००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी २५०-२८०, जाड : १२०-१४०, शेवगा : ८००-९००, गाजर : ३००- ३५० वालवर : ३५०-४००, बीट : १५०-१६०, घेवडा : ३००-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३५०, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २५०-३५०, पावटा : ४००-५००, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार - १०००-१२००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण :१८०-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्याचे शेकड्याचे दर 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे ८० हजार तर मेथीच्या २० हजार जुड्या आवक झाली होती. 
कोथिंबीर - १५००-२२००, मेथी -१०००-२२००, शेपू ८००-१०००, कांदापात ८००-१२००, चाकवत -४००-५००, करडई ४००-५००, पुदिना २००-४००, अंबाडी - ५००-७००, मुळे - ८००-१२००, राजगिरा - २००-६००, चुका ५००-८००, चवळई - ८००-१५००, पालक १२००-२०००. 

फळबाजारात रविवारी (ता.१०) लिंबाची सुमारे चार हजार गोणी, डाळिंबाची सुमारे ३० टन, मोसंबी ६० टन, संत्रा ४० टन, पपई १० टेम्पो, चिकू दीड हजार गोणी, पेरूची सुमारे ८०० क्रेट, सीताफळ १५ टन, कलिंगड आणि खरबूज प्रत्येकी ३ टेम्पो आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : २५०-४००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३२०, (४ डझन) : ६० -१३०, संत्रा : (१० किलो) : १००-४५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१८०, गणेश : १०-४०, आरक्ता २०-६०. कलिंगड : ८-१२ खरबूज : २०-२५ पपई : १५-२५, चिकू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो): ३००-४००, सीताफळ २०-२००, सफरचंद - काश्‍मिर डेलिशिअस (१५ किलो) ११००-१५००, सीमला (२५ -३० किलो) - २०० ते २५००, गोल्डन (१० किलो) -१३००-१४००. 
 

फुलबाजार 
पावसामुळे फुले भिजल्याने आवक कमी झाली होती. तर नवरात्र आणि मंदिरे उघडली असल्याने मागणी वाढल्याने विविध फुलांच्या दरात वाढ झाली होती. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-६०, गुलछडी : ५०-१२०, अष्टर : जुडी ६-१२, सुट्टा २०-४०, कापरी : १०-४०, शेवंती : ५०- १२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १५-३०, गुलछडी काडी : ३०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जरबेरा : १०-४०, कार्नेशियन : ८०- १२०, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ३५०-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ३०-६०, जुई १०००-१२००, चमेली -७००-८००. 

मटण मासळी 
नवरात्रोत्सव सुरु असल्याने मटण, मासळी, चिकनच्या मागणीत घट झाली आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.१०) खोल समुद्रातील मासळची सुमारे ५ टन, खाडीच्या मासळीची २०० किलो, नदीच्या मासळीची ५०० किलो तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलनची ६ टन मासळीची आवक झाली होती. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १०००-१४०० मोठे -१०००-१२०० मध्यम : ४५०-४८०, लहान ४००-६५०, भिला : ४००-४८०, हलवा : ४००-४८०, सुरमई : ३६०-५५०, रावस : लहान ४८०-६५०, मोठा : ७५०- ८०० घोळ : ४८०-५०० करली : १६०-२४०, पाला : १०००-१४००, वाम : पिवळी : ४८०-५५०, करंदी ४०० (सोललेली), ओले बोंबील : ८०-१४० 

कोळंबी : लहान १६०-२८०, मोठी-३६०-४८०, जंबो प्रॉन्स : १०००-१२०० किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २८०, खेकडे : २४०-२८० चिंबोऱ्या : ४००-४८०, मांदेली-१००-१४०, राणीमासा-१६०-२०० 

खाडीची मासळी : सौंदाळे-२८०, खापी-१६०-१८०, नगली : ३६०-४००, तांबोशी : ४००-४८०, पालू- २८०, बांगडा : लहान-१६०-१८०, बांगडा मोठा- २००-२४०, शेवटे २००-२४०. तिसºया: २००-२४० , खुबे : १००-१२०, लेपा-१२०-२००, शेवटे-२००-२४०, पेडवी-१००, वेळुंजी-१००-१६०, तारली-१६० 

नदीतील मासळी 
रहू-१२०-१६०, कतला-१२०-१६०, मरळ-३२०-३६०, शिवडा-२४०, खवली-२४०, आम्ळी-१६०, खेकडे-२००-२४०, वाम-४८० 

मटण- बोकडाचे ६८०, बोलाईचे- ६८०, खिमा-६८०, कलेजी-७२० 
चिकन २१०, लेगपीस-२५०, जिवंत कोंबडी-१५०, बोनलेस-३०० 

अंडी 
गावरान शेकडा ९२०, डझन १२०, प्रतिनगास १० 
इंग्लिश शेकडा ४५० डझन ६०, प्रतिनगास ५ 
 


इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात सिमला मिरची, वांगी, गवार तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये डाळिंब दरात सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...