पुण्यात टोमॅटो, फ्लॉवरची आवक कमी; दरात सुधारणा

पुण्यात टोमॅटो, फ्लॉवरची आवक कमी; दरात सुधारणा
पुण्यात टोमॅटो, फ्लॉवरची आवक कमी; दरात सुधारणा

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २२) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. पावसाने बहुतांश ठिकाणी उघडीप दिल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. कोथिंबिरीची सुमारे ३ लाख तर मेथीची सुमारे २ लाख जुड्यांची आवक झाली होती. तर टोमॅटो, फ्लॉवर, सिमला मिरची आणि मटारच्या आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली होती. कांद्याचे दर स्थिर होते. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून बंगलोर येथून आले २ टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ६ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, इंदौर आणि कर्नाटक येथून गाजर प्रत्येकी सुमारे २ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा सुमारे ४ टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग सुमारे १ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात मधून लसूणाची सुमारे ५ हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ६५ ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे दीड हजार गोणी, टॉमेटो सुमारे ५ हजार क्रेट, पावटा ७ टेम्पो, गाजर ३ टेम्पो, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, तांबडा भोपळा (डांगर) प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, मटार २०० गोणी, भुईमूग शेंग सुमारे १०० गोणी, हिरवी मिरची ५ टेम्पो तसेच कांदा सुमारे १२५ ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ३५०-४००, बटाटा : १००-१६०, लसूण : १०००-१६००, आले : सातारी ४००-६००, बंगळूर ३००-४००, भेंडी : २००-३००, गवार : २००-३००, टोमॅटो : १४०-१८०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १५०-२२०, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २४०-२५०, पांढरी २००-२२०, पापडी : २००-२२०, पडवळ : २४०-२५०, फ्लॉवर : १६०-२२०, कोबी : १००-१४०, वांगी : १५०-२००, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १२०-१३०, शेवगा : ४५०-५००, गाजर : २५०-३००, वालवर : २५०-३००, बीट : १८०-२००, घेवडा : ४००-६००, कोहळा : १५०-२००, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : २००-२२०, भुईमूग शेंग : ५५०, मटार : १०००-१२००, तांबडा भोपळा : ८०-१२०, सुरण : २४०-२५०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या  पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २०० -६००, मेथी : २००-७००, शेपू : ३००-६००, कांदापात : ८०० -१२००, चाकवत : ६०० -८००, करडई : ५०० -६००, पुदिना : २०० -२५०, अंबाडी : ७००-८००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४०० -५००, चुका : ७००-८००, चवळई : ४०० -५००, पालक : ४०० -५००.

फूल बाजार पितृपंधरवडा सुरू असल्याने फुलांच्या मागणीतील घट कायम आहे. पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१०, गुलछडी : ३०-४०, बिजली : ५-२०, कापरी : ५-१०, शेवंती : ५-१०, अ‍ॅस्टर : ६-१२, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : २०-७०, लिली बंडल : ३-६, जरबेरा : १०-२०, कार्नेशियन : २०-६०.

फळ बाजार  रविवारी (ता. २२) मोसंबी सुमारे ४० टन, संत्री १५ टन, डाळिंब २५० टन, पपई २० टेम्पो, लिंबे सुमारे दीड हजार गोणी, चिक्कू दीड हजार डाग, कलिंगड, खरबूज प्रत्येकी ३ टेम्पो, पेरूची सुमारे ३०० क्रेट, तर सीताफळाची सुमारे ६ टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ३००-८००, मोसंबी : (३ डझन) : १७०-३५०, (४ डझन ) : ९०-१७०, संत्रा : (३ डझन) : १५०-३५०, (डझन ४) : ६०-१५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१५० गणेश ५-३०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ८-१५ खरबूज : २०-२५, पपई : ८-२०, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) ८००-१२००, सफरचंद सिमला (२५ किलो) - १२००-२२००

मटण-मासळी  गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २२) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीची १ टन  तर नदीच्या मासळीची सुमारे अडीच टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १० टन आवक झाली होती. 

खोल समुद्रातील मासळी  पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १४००-१५००, मध्यम : ८००, लहान ६००, भिला : ४००-४८०, हलवा : ४००-४८०, सुरमई : ४८०-५५०, रावस : ५५०-६००, घोळ : ५५०, भिंग : ३६०, करली : २४०-२८०, करंदी :  सोलली २८०- ३६०, पाला : लहान ७००-८०० मोठा ११००-१२००, वाम : पिवेळो लहान  ४००-४८०, मोठेही ७००-८०० ओले बोंबील : ८०-१६०, कोळंबी ः लहान २४० मोठी ४८०, जंबोप्रॉन्स : १३००, किंगप्रॉन्स : ७५०-८००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान १६०-२०० मोठी २८०-३५०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०-५५०. 

खाडीची मासळी सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : लहान ३६० मोठी  ७००-८००, तांबोशी : ४००- ४८०, पालू : २४०-२८०, लेपा : लहान १००-१४० मोठे २००-२४०, शेवटे : २८०, बांगडा : लहान १६०-१८० मोठे २००-२८०, पेडवी : ८०, बेळुंजी : १६०-२००, तिसऱ्या : १६०-२००, खुबे : १४०-१६०, तारली : १४०-१८०.

नदीची मासळी रहू : १२०-१६०, कतला : १६०, मरळ : २८०-३२०, शिवडा : २४०, चिलापी : ६०-८०, खवली : १८०-२२०, आम्ळी : १००-१२०, खेकडे : २४०, वाम : ५००. 

मटण बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५६०. 

चिकन चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 

अंडी गावरान : शेकडा : ७२० डझन : ९६ प्रति नग : ८. इंग्लिश : शेकडा : ४४३ डझन : ६० प्रतिनग : ५.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com