Agriculture news in Marathi, Pune tomatoes, flower arrivals reduced; Improvement in rates | Agrowon

पुण्यात टोमॅटो, फ्लॉवरची आवक कमी; दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २२) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. पावसाने बहुतांश ठिकाणी उघडीप दिल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. कोथिंबिरीची सुमारे ३ लाख तर मेथीची सुमारे २ लाख जुड्यांची आवक झाली होती. तर टोमॅटो, फ्लॉवर, सिमला मिरची आणि मटारच्या आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली होती. कांद्याचे दर स्थिर होते. 

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २२) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. पावसाने बहुतांश ठिकाणी उघडीप दिल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. कोथिंबिरीची सुमारे ३ लाख तर मेथीची सुमारे २ लाख जुड्यांची आवक झाली होती. तर टोमॅटो, फ्लॉवर, सिमला मिरची आणि मटारच्या आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली होती. कांद्याचे दर स्थिर होते. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून बंगलोर येथून आले २ टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ६ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, इंदौर आणि कर्नाटक येथून गाजर प्रत्येकी सुमारे २ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा सुमारे ४ टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग सुमारे १ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात मधून लसूणाची सुमारे ५ हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ६५ ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे दीड हजार गोणी, टॉमेटो सुमारे ५ हजार क्रेट, पावटा ७ टेम्पो, गाजर ३ टेम्पो, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, तांबडा भोपळा (डांगर) प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, मटार २०० गोणी, भुईमूग शेंग सुमारे १०० गोणी, हिरवी मिरची ५ टेम्पो तसेच कांदा सुमारे १२५ ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ३५०-४००, बटाटा : १००-१६०, लसूण : १०००-१६००, आले : सातारी ४००-६००, बंगळूर ३००-४००, भेंडी : २००-३००, गवार : २००-३००, टोमॅटो : १४०-१८०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १५०-२२०, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २४०-२५०, पांढरी २००-२२०, पापडी : २००-२२०, पडवळ : २४०-२५०, फ्लॉवर : १६०-२२०, कोबी : १००-१४०, वांगी : १५०-२००, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १२०-१३०, शेवगा : ४५०-५००, गाजर : २५०-३००, वालवर : २५०-३००, बीट : १८०-२००, घेवडा : ४००-६००, कोहळा : १५०-२००, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : २००-२२०, भुईमूग शेंग : ५५०, मटार : १०००-१२००, तांबडा भोपळा : ८०-१२०, सुरण : २४०-२५०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २०० -६००, मेथी : २००-७००, शेपू : ३००-६००, कांदापात : ८०० -१२००, चाकवत : ६०० -८००, करडई : ५०० -६००, पुदिना : २०० -२५०, अंबाडी : ७००-८००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४०० -५००, चुका : ७००-८००, चवळई : ४०० -५००, पालक : ४०० -५००.

फूल बाजार
पितृपंधरवडा सुरू असल्याने फुलांच्या मागणीतील घट कायम आहे. पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१०, गुलछडी : ३०-४०, बिजली : ५-२०, कापरी : ५-१०, शेवंती : ५-१०, अ‍ॅस्टर : ६-१२, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : २०-७०, लिली बंडल : ३-६, जरबेरा : १०-२०, कार्नेशियन : २०-६०.

फळ बाजार 
रविवारी (ता. २२) मोसंबी सुमारे ४० टन, संत्री १५ टन, डाळिंब २५० टन, पपई २० टेम्पो, लिंबे सुमारे दीड हजार गोणी, चिक्कू दीड हजार डाग, कलिंगड, खरबूज प्रत्येकी ३ टेम्पो, पेरूची सुमारे ३०० क्रेट, तर सीताफळाची सुमारे ६ टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ३००-८००, मोसंबी : (३ डझन) : १७०-३५०, (४ डझन ) : ९०-१७०, संत्रा : (३ डझन) : १५०-३५०, (डझन ४) : ६०-१५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१५० गणेश ५-३०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ८-१५ खरबूज : २०-२५, पपई : ८-२०, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) ८००-१२००, सफरचंद सिमला (२५ किलो) - १२००-२२००

मटण-मासळी 
गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २२) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीची १ टन  तर नदीच्या मासळीची सुमारे अडीच टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १० टन आवक झाली होती. 

खोल समुद्रातील मासळी 
पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १४००-१५००, मध्यम : ८००, लहान ६००, भिला : ४००-४८०, हलवा : ४००-४८०, सुरमई : ४८०-५५०, रावस : ५५०-६००, घोळ : ५५०, भिंग : ३६०, करली : २४०-२८०, करंदी :  सोलली २८०- ३६०, पाला : लहान ७००-८०० मोठा ११००-१२००, वाम : पिवेळो लहान  ४००-४८०, मोठेही ७००-८०० ओले बोंबील : ८०-१६०, कोळंबी ः लहान २४० मोठी ४८०, जंबोप्रॉन्स : १३००, किंगप्रॉन्स : ७५०-८००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान १६०-२०० मोठी २८०-३५०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०-५५०. 

खाडीची मासळी
सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : लहान ३६० मोठी  ७००-८००, तांबोशी : ४००- ४८०, पालू : २४०-२८०, लेपा : लहान १००-१४० मोठे २००-२४०, शेवटे : २८०, बांगडा : लहान १६०-१८० मोठे २००-२८०, पेडवी : ८०, बेळुंजी : १६०-२००, तिसऱ्या : १६०-२००, खुबे : १४०-१६०, तारली : १४०-१८०.

नदीची मासळी
रहू : १२०-१६०, कतला : १६०, मरळ : २८०-३२०, शिवडा : २४०, चिलापी : ६०-८०, खवली : १८०-२२०, आम्ळी : १००-१२०, खेकडे : २४०, वाम : ५००. 

मटण
बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५६०. 

चिकन
चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 

अंडी
गावरान : शेकडा : ७२० डझन : ९६ प्रति नग : ८. इंग्लिश : शेकडा : ४४३ डझन : ६० प्रतिनग : ५.  
 


इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात कांद्याच्या दरातील तेजी...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटोची आवक वाढतीचकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
सांगलीत गूळ सरासरी ३४६० रुपये सांगली :  येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी...
कोल्हापुरात टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
औरंगाबाद : बाजरी, सोयाबीनचे दर स्थिर;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात पालेभाज्यांसह शेवगा, बीटच्या...पुणे ः अवकाळी पावसामध्ये खरिपातील...
औरंगाबादेत गाजर २००० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत मेथी जुडी प्रतिशेकडा ६०० ते १०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा दोन ते दहा हजार रुपये...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरातील...
जळगावात वांगी १८०० ते २९०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सोलापुरात कांद्याला कमाल ११ हजार दरसोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...