Agriculture news in Marathi In Pune, vegetable imports declined; Rate fixed | Agrowon

पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जानेवारी 2021

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) भाजीपाल्यांची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक घटली होती. तर हिरवी मिरची, गाजराच्या दरात तुलनेने वाढ झाली होती. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १७) भाजीपाल्यांची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक घटली होती. तर हिरवी मिरची, गाजराच्या दरात तुलनेने वाढ झाली होती. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

परराज्यांतून आलेल्या आवकेमध्ये मध्य प्रदेशातून १० ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ४ ट्रक, तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, राजस्थानहून ८ टेम्पो गाजर आणि मध्य प्रदेशातून लसणाची ८ ट्रक आवक झाली होती. स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार पोती, कोबी ८ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, गवार ५ टेम्पो, तांबडा भोपळा ८ टेम्पो, टॉमेटो १० हजार क्रेट, कांदा नवीन आणि जुना सुमारे १२५ ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर व स्थानिक भागांतून ३५ ट्रक बटाटा आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव -
कांदा : २००-३००, बटाटा : १००-१६०, लसूण : ४००-९००, आले : सातारी १५०-२००, भेंडी : २००-२५०, गवार : ३००-४००, टोमॅटो : ५०-६०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : ३५०-५००, दुधी भोपळा : ८०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१००, कारली : हिरवी २००-२२०, पांढरी १४०-१५०, पापडी : २००-२५०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ५०-६०, कोबी : ३०-५०, वांगी : २००-२५०, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : २००- २५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : ९०-१००, शेवगा : ५००-६००, गाजर : १५०-१८०, वालवर : २५०-३००, बीट : ५०-६०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१२०, आर्वी : १८०-२००, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : २००-२२०, पावटा : २००-२५०, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : २००-२५०, स्थानिक -२५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची ४० आणि हरभऱ्याच्या ५० हजार जुड्या आवक झाली होती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-८००, मेथी : ८००-१०००, शेपू : ५००-८००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ४००-५००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ८००-१०००, पालक : ४००-६००, हरभरा गड्डी - ४००-६००.

फळबाजार
फळबाजारात लिंबांची सुमारे २ हजार गोणी, संत्री ३ आणि मोसंबी सुमारे ३० टन, डाळिंब २० टन, पपई २० टेम्पो, चिकू सुमारे १ हजार गोणी, कलिंगड सुमारे २५ आणि खरबूज सुमारे १५ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे ३५० गोणी, पेरू ४०० क्रेट, स्ट्रॉबेरी १५ टन आवक झाली होती. तर द्राक्षांची बारामती, फलटण, सांगली, इंदापूर आणि पंढरपूर भागांतून ५ टन आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-५५०, मोसंबी : (३ डझन) : ३००-५००, (४ डझन) : १८०-३००, संत्रा : (१० किलो) : २२०-४५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२५०, गणेश : १०-५०, आरक्ता २०-१००. कलिंगड : ३-८, खरबूज : १०-३०, पपई : ५-२०, चिकू (१० किलो) : १००-६००, बोरे (१० किलो)- चमेली २२०-२७०, उमराण ४०-६०, चण्यामण्या ५५०-६००, चेकनेट ६००-७००. स्ट्रॉबेरी (२ किलो) १००-२५०. पेरू (२० किलो) - ३५०-६००. द्राक्षे - जम्बो (१०किलो) ६००-९००, सोनाका (१५ किलो) ७००-१३००.

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ५०-८०, ॲस्टर : (५ जुड्या) ८-१६, सुटा ५०-७०, कापरी : १०-३०, शेवंती ६०-१२०, गुलाब गड्डी : २५-५०, गुलछडी काडी : १०-६०, डच गुलाब (२० नग) : ८०-१२०, जरबेरा : २०-३०. कार्नेशियन : ६०- १२०. शेवंती काडी -१००-२५०, लिलीयन (१० काड्या) ८००-१३००, ऑर्चिड - २००-४००, ग्लॅडिओलस - (१० काड्या) - २०-४०.

मटण-मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १७) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडी ५०० किलो, तर नदीच्या मासळीची दोन टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १५ टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

दरम्यान, मार्गशीर्ष संपल्यामुळे आणि बर्ड फ्लूच्या भीतीने चिकनची मागणी घटल्याने मासळीसह मटणाला मागणी वाढली आहे. तसेच  मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळीच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-१५०० मोठे १३००-१४०० मध्यम : १०००  लहान ७००, भिला : ५५०, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ४८०-५५०, रावस : लहान ६०० मोठा : ७५०-८००, घोळ : ६००, भिंग : ४००, करली : २८०, करंदी : (सोललेली) ४८०, पाला :  लहान ८०० मोठे १२००, वाम :  लहान ४०० मोठी ७५०, ओले बोंबील : २४०.

कोळंबी ः लहान ३६० मोठी : ४८०-५५०, जंबो प्रॉन्स : १४००,  किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १०००-१२००, मोरी : २८०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे  : लाल : २८०, चिंबोऱ्या : ५५०.

खाडीची मासळी : सौंदाळे : २४०-२८०, खापी : २४०-२८०, नगली : लहान ३२० मोठी ६५०, तांबोशी : ४८०, पालू : २४०, लेपा : लहान १६० मोठे २८०, शेवटे : २००, बांगडा : लहान २०० मोठे : २४०-२८०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०  तिसऱ्या : २४०, खुबे : २४०, तारली : २००.

नदीची मासळी : रहू : १६० कतला : १६०, मरळ : ४८०, शिवडा : २८०, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २००, वाम : ५५०.

चिकन : चिकन : १८०, लेगपीस : २२० जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०.

अंडी : गावरान : शेकडा : ८०० डझन : १०८ प्रति नग : ९, इंग्लिश : शेकडा : ४२१ डझन : ६० प्रतिनग : ५.

मटण : बोकडाचे : ६६० बोल्हाईचे : ६६० खिमा : ६६०, कलेजी : ६६०.


इतर बाजारभाव बातम्या
नगरला शेवगा, वांग्यांचे दर टिकून;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या आवकेत सुधारणा;...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
औरंगाबादमध्ये कैरी खातेय भाव;...औरंगाबाद : आठवडाभरात जवळपास चार वेळा आवक झालेली...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीच्या दरात...सोलापूर  ः सोलापूरबाजार समितीच्या आवारात...
औरंगाबादेत बटाटा सरासरी ८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात काकडी, फ्लॉवरच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात टोमॅटो १५० ते १००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते ६०० रुपये दर...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात घेवडा, भेंडी, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये तुरीला क्विंटलला सव्वा सहा... नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याचे दर स्थिर पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगलीत बेदाण्याला उच्चांकी २७१ रुपये दरसांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा...
खानदेशात कांदा दर स्थिरजळगाव ः खानदेशात मागील महिनाभरापासून कांदा दर...
औरंगाबादमध्ये द्राक्षांना क्विंटलला...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात हरभरा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात हरभरा दरात सुधारणा झाली असून, दर...
राज्यात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटललातुरात प्रतिक्विंटलला ७००० ते १२५०० रुपये...