agriculture news in marathi Punjab Chief Minister assured farmers for possible help against new farm laws | Agrowon

कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर लढू : मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग

वृत्तसेवा
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबने ही लढाई आता सर्वोच्च न्यायालयामध्ये नेण्याचा निर्धार केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी मंगळवारी (ता.३०) आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची पाठराखण करताना त्यांना सर्वप्रकारची कायदेशीर आणि आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन दिले.

चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबने ही लढाई आता सर्वोच्च न्यायालयामध्ये नेण्याचा निर्धार केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी मंगळवारी (ता.३०) आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची पाठराखण करताना त्यांना सर्वप्रकारची कायदेशीर आणि आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन दिले. दुसरीकडे शेतकरी संघटनांनी आणखी काही काळ राज्यातील रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा दिला असून हरियानामध्येही आज सलग सहाव्या दिवशी रेल रोको आंदोलन सुरूच होते.

अमरिंदरसिंग यांनी मंगळवारी ३१ शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा करत त्यांची मते जाणून घेतली. सध्या याबाबत आपण कायदेतज्ञ्जांची मते जाणून घेत आहोत, यानंतर पुढील लढाईची रणनीती आखण्यात येईल. राज्यांच्या अधिकारांवर केंद्राने हे आक्रमण केले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्वतोपरी उपाययोजना करू, असे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना सांगितले. केंद्राच्या कायद्याविरोधात दोन हात करण्यासाठी वेगळ्या कायद्यांच्या निर्मितीची सूचना करण्यात आल्यास यासाठी तातडीने विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्यात येईल, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.

आम्ही सर्व आघाड्यांवर लढाई लढू, राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या कृषी कायद्यांविरोधात ठराव मंजूर करावेत, हे ठराव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येतील.
-कॅ. अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री, पंजाब

 


इतर ताज्या घडामोडी
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...
अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा पिकवा...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी...सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील...
नगरमध्ये कांदा आठ हजार रुपये क्विंटलनगर ः नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम...