पंजाबातील शेतकऱ्यांचा 'रेल रोको' मागे

पंजाबातील शेतकऱ्यांचा 'रेल रोको' मागे
पंजाबातील शेतकऱ्यांचा 'रेल रोको' मागे

अमृतसर/नवी दिल्ली : पंजाबात शेतकऱ्यांनी सुरू केलेले रेल्वे रोको आंदोलन न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर बुधवारी (ता. ६) मागे घेतले आहे. पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयात दाखल याचिकेनंतर न्यायालयाने पंजाब, केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांना हजर राहण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. किसान मजदूर संघर्ष समितीने हे आंदोलन पुकारले आहे.    पंजाब राज्यात शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाने दिल्ली-अमृतसर रेल्वे सेवा पूर्णत: खंडित झाली आहे. सुमारे ३८ ट्रेन रद्द करण्यात आल्या असून तीन दिवसात ८५ ट्रेन आणि सुमारे ८५ हजार प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. चार मार्चपासून आंदोलन करत आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँका आणि इतर पतपुरवठा संस्था प्रचंड त्रास देत असून अपमानित करत असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष सतनामसिंग पन्नू यांनी केला आहे.  शेतकऱ्यांच्या मागण्या... 

  •   संपूर्ण कर्जमाफी
  •   स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी
  •   जमीन अधिग्रहण थांबवावे
  •   शेतकरी अटक सत्र थांबवावे
  •   ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 
  • १५ टक्के व्याजासह पेमेंट द्यावे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com