agriculture news in marathi Punjab Youth Congress workers set tractor on fire, protest at India Gate | Agrowon

कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया गेटसमोर ट्रॅक्टर पेटवला..!

वृत्तसेवा
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक्कामोर्तब केल्यानंतर शेतकऱ्यांमधील आंदोलनाचा भडका जास्तच पेटला आहे.

नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) शिक्कामोर्तब केल्यानंतर शेतकऱ्यांमधील आंदोलनाचा भडका जास्तच पेटला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात सोमवारी (ता.२८) सकाळी आंदोलकांनी इंडिया गेटसमोर एका ट्रॅक्टरला आग लावली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. पंजाब युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंडिया गेटवर आंदोलन केलं. 

इंडिया गेट समोर एका ट्रकमधून ट्रॅक्टर आणून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७.१५ ते ७.३० च्या दरम्यान जवळपास १५ ते २० लोक कृषी कायद्याच्या विरोधात इंडिया गेटजवळ एकत्र आले. त्यांनी सोबत एक जुना ट्रॅक्टर आणला होता. त्या ट्रॅक्टरमध्ये आग लावल्यानंतर जोरदार घोषणाबाजीसुद्धा झाली.पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांकडून काँग्रेस झिंदाबाद अशा घोषणा दिल्या जात होत्या. अग्निशमन दलाने ट्रॅक्टरची आग विझविली.  यावेळी कार्यकर्त्यांजवळ शहीद भगतसिंग यांचे छायाचित्र होते.(शहीद भगतसिंग यांची आज जयंती आहे.) 


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...