Agriculture news in marathi Punjabrao Deshmukh university Former students help CM Fund | Agrowon

‘पीकेव्ही’च्या माजी विद्यार्थ्यांची सीएम फंडाला मदत 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

अकोला ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्याच्या उद्देशाने शासनाला मदत करण्यासाठी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. एक लाख १८ हजार ८११ रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आहे. 

अकोला ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्याच्या उद्देशाने शासनाला मदत करण्यासाठी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. एक लाख १८ हजार ८११ रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आहे. 

सद्यःस्थितीत कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत व राज्यासाठी एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या २००७-२०११ एफएफ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला तब्बल १ लाख १८ हजार ८११ रुपयांची आर्थिक मदत ऑनलाइन स्वरूपात प्रदान केली. 

‘पीकेव्ही’च्या काही माजी विद्यार्थ्यांनी खुखार लेकरं व कॉलेज कट्टा या आपल्या व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला ग्रुपमधील सहकाऱ्यांनी एकमेकांशी चर्चा करून त्वरित शासनाला आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे निश्चित केले. या मोहिमेमध्ये १०८ माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत २ दिवसांमध्ये तब्बल १ लाख १८ हजार ८११ गोळा करून १ मे महाराष्ट्रदिनी ही सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ऑनलाइन स्वरूपात पाठविण्यात आली. 

विशेष म्हणजे या अगोदरही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या तीन बॅचने सुद्धा राज्य सरकारला मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक स्वरूपात मदत केली आहे. आजपर्यंत पीकेव्हीच्या माजी विद्यार्थ्यांकडून सरकारच्या खात्यात २ लाख ६२ हजार ६११ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेत आभाराचे पत्र प्रत्येक ग्रुपला पाठवले आहे. कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...