Agriculture news in Marathi Purchase of 12 lakh quintals of gram in Nanded, Parbhani, Hingoli | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची सव्वादोन लाख क्विंटल खरेदी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या १९ केंद्रांवर नोंदणी केलेल्या ३७ हजार ३१६ शेतकऱ्यांपैकी शुक्रवार (ता. १०) पर्यंत १५ हजार ३२२ शेतकऱ्यांच्या २ लाख ३४ हजार ६४६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी  करण्यात आली आहे

नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या १९ केंद्रांवर नोंदणी केलेल्या ३७ हजार ३१६ शेतकऱ्यांपैकी शुक्रवार (ता. १०) पर्यंत १५ हजार ३२२ शेतकऱ्यांच्या २ लाख ३४ हजार ६४६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी  करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या नांदेड, हदगाव, किनवट, बिलोली, देगलूर, मुखेड या सहा केंद्रांवर हमीभावाने (४८७५ रुपये प्रतिक्विंटल) हरभरा विक्रीसाठी १६ हजार ४३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ७ हजार ३०५ शेतकऱ्यांच्या १ लाख २६ हजार २५८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या सात केंद्रावर नोंदणी केलेल्या ११ हजार ६५ पैकी ३ हजार ४४३ शेतकऱ्यांचा ४१ हजार ७५१ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या सहा केंद्रांवर नोंदणी केलेल्या ९ हजार ८१३ पैकी ४ हजार ४८४ शेतकऱ्यांचा ६६ हजार ६३७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

केंद्रनिहाय हरभरा खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)
केंद्र नोंदणी शेतकरी संख्या खरेदी शेतकरी संख्या हरभरा
नांदेड १८४० १४२८ २३५०२
हदगाव ८३२९ १७४२ ३०२५१
किनवट १९९० १२४८ २२३८८
बिलोली १९५० ११६९ १९६५४
देगलूर १५९२ १०७५ १९३६३
मुखेड ७३७ ६४३ ११०७९
परभणी ३८९८ ९५४ १२००४
जिंतूर १७६३ २८८ ३२५९
बोरी ६२७ ४१९ ५२४६
सेलू ४१० १६६ १७५१
पाथरी १४३४ ८६४ १०७७१
सोनपेठ ६२७ ५३४ ३३८
पूर्णा २२२१ ४१४ ५१५२
हिंगोली १९७६ १०४४ १६५६२
कळमनुरी १९६७ १०६० १४०२७
वसमत ११५१ १०९ १२९९
जवळा बाजार ३०७८ १०२९ १२६०७
सेनगाव ८५२ ७३८ १२०६०
साखरा ७८९ ६१४ १००९०

 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...