Agriculture news in marathi Purchase of 1.5 lakh quintals of cotton in Parbhani | Agrowon

परभणीत दीड लाख क्विंटल कापसाची खरेदी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने (सीसीआय) जिल्ह्यातील चार केंद्रांवर शुक्रवारपर्यंत (ता. २७) ६ हजार ८३७ शेतकऱ्यांच्या १ लाख ६३ हजार ८५२ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातील सूत्रांनी दिली.

परभणी :  भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने (सीसीआय) जिल्ह्यातील चार केंद्रांवर शुक्रवारपर्यंत (ता. २७) ६ हजार ८३७ शेतकऱ्यांच्या १ लाख ६३ हजार ८५२ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातील सूत्रांनी दिली.

भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने गुरुवारी (ता. १९) ते सोमवार (ता. २३) या कालावधीत जिल्ह्यातील  सेलू, मानवत, जिंतूर, पू्र्णा या चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांर्तगत हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे. खुल्या बाजारातील तसेच खेडा पद्धतीने कमी दराने खरेदी केली जात आहे. त्यात राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे कापूस खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी वाहनांच्या रांगा लागत आहेत. मध्यम धाग्याच्या कापसाची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ५ हजार ५१५ रुपये तर लांब धाग्याच्या कापसाची आधारभूत किंमत ५ हजार ८२५ रुपये आहे.

शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मार्केट यार्डावर कापूस विक्रीसाठी आणताना सोबत सात बारा उतारा, आधारकार्ड, बॅंक खाते पुस्तक यांच्या सत्यप्रती घेऊन याव्यात. चुकारे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केले जातील. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून येणे आवश्यक आहे, असे निर्देश बाजार समित्या तसेच सीसीआयतर्फे देण्यात आलेले 
आहेत.

प्रत्येक बाजार समितीत शासकीय खरेदी केंद्र हवे
जिल्ह्यातील अकरा कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी आजवर केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आधारभूत किंमत दराने कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. परभणी, बोरी, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, ताडकळस या सात कृषी उत्पन्न बाजार समित्या अंतर्गत अद्याप हमीभावाने कापूस खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कमी दराने कापूस खरेदी करून व्यापारी लूट करीत आहेत. दूर अंतरावरील केंद्रांवर कापूस नेण्यासाठी वाहन भाड्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. केंद्रांवर वाहनांची गर्दी होत असल्याने मोजमापास वेळ लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक बाजार समितीमध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कापूस खरेदी स्थिती (क्विंटल)        

खरेदी केंद्र   शेतकरी संख्या  कापूस खरेदी
जिंतूर   ५२३   ११९२६
सेलू   ३४४६   ८८४८३
मानवत २७५४ ६०४१९
पूर्णा   ११४   ३०२२

 


इतर ताज्या घडामोडी
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी...नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा...
गोसेखुर्दच्या कामात हयगय नको : नितीन...नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही...
ट्रॅक्टर मोर्चाबाबत आज सर्वोच्च...नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत...
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये...रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये...
स्थानिक वाण, प्रक्रिया पदार्थांना हवे ‘...स्थानिक वाण अधिक उत्पादनक्षम नसले, तरी त्यातील...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू...औरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात...
सांगलीत कारखानदारांनी एफआरपीचा केला...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर...
बँकांनी पीक कर्जवाटप वेळेत पूर्ण करावे...नगर:  ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना...
सांगलीत ‘पीएम किसान’च्या अपात्र...सांगली : पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५...
सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या ...सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे...
नाशिकला मका खरेदीसाठी ५६ हजार क्विंटलचे... येवला : केंद्र शासनाच्या परवानगीनंतर ही...