बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदी

नोंदणी केलेल्या नावावरील खरेदी बाकी आहे. त्यानुसार कापसाची खरेदी होण्याची आशा आहे. पडताळणीला पंधरवडा लोटला. तरी, अजून कापूस घेऊन कुठे यायचे याची सूचना नाही. - बंडू यादव, कापूस उत्पादक, गंगावाडी, ता. गेवराई, जि. बीड
 Purchase of 18 lakh quintals of cotton in Beed division
Purchase of 18 lakh quintals of cotton in Beed division

बीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड विभागांतर्गत सर्व केंद्रांवरून आतापर्यंत जवळपास १८ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली, अशी माहिती कापूस पणन महासंघाच्या बीड कार्यालयातर्फे देण्यात आली.

गत हंगामातील उत्पादित कापसाची खरेदी यंदा लांबली आहे. पणन महासंघातर्फे बीड विभागात कापसाच्या खरेदीसाठी केंद्रे सुरू करण्यात आली. सुरुवातीला जवळपास २३ पेक्षा जास्त केंद्रांवर सुरू असलेली ही कापूस खरेदी आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असल्याचे महासंघाच्या सूत्रांनी सांगितले. 

सद्यस्थितीत बीड जिल्ह्यातील माजलगाव, भोपा मैदा, पात्रूड, तर लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे खरेदी सुरू आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीची पडताळणी केल्यानंतर महासंघाच्या केंद्रांपैकी बीड तालुक्यातील शेतकऱ्यांची कापूस खरेदी बाकी आहे. त्यामुळे मैदा येथे खरेदी सुरू ठेवण्यात आली आहे. परळी, अंबाजोगाई, केज आदी ठिकाणची कापूस खरेदी संपली आहे. माजलगाव येथील कापूस खरेदी अंतिम टप्प्यात आहे, असे महासंघाच्या बीड कार्यालयातर्फे सांगण्यात आले. 

गेवराई तालुक्यातील कापूस खरेदी ‘सीसीआय’मार्फत सुरू आहे. येथील शेतकऱ्यांचीही नोंदणीनुसार पडताळणी करण्यात आली. परंतु, अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होणे बाकी आहे. नोंदणी केली. पडताळणी झाली. कापूस शिल्लक असल्याचेही स्पष्ट झाले. मग, खरेदीला विलंब का होतोय, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com