Agriculture news in Marathi Purchase of 2 lakh 90 thousand quintals of cotton in Parbhani | Agrowon

परभणीत दोन लाख ९० हजार क्विंटल कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 डिसेंबर 2020

आधारभूत किंमत खरेदी दराने परभणी जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) पाच केंद्रांवर आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या एका केंद्रावर गुरुवार (ता. ५) पर्यंत ११ हजार ७३८ शेतकऱ्यांच्या २ लाख ९० हजार ४५८ क्विंटल कापसाची करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातील सूत्रांनी दिली.

परभणी ः आधारभूत किंमत खरेदी दराने परभणी जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) पाच केंद्रांवर आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या एका केंद्रावर गुरुवार (ता. ५) पर्यंत ११ हजार ७३८ शेतकऱ्यांच्या २ लाख ९० हजार ४५८ क्विंटल कापसाची करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातील सूत्रांनी दिली.

भारतीय कापूस महामंडळातर्फे गुरुवार (ता. १९) ते बुधवार (ता. २) या कालावधीत जिल्ह्यातील सेलू, मानवत, जिंतूर, पू्र्णा, ताडकळस या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांर्तगत हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे.

गुरुवारी (ता. ३) पणन महासंघातर्फे पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत बाभळगाव (ता. पाथरी) येथे कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. यंदा मध्यम धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ५५१५ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ५८२५ रुपये एवढी आधारभूत किंमत आहे.

पणन महासंघाच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी परभणी, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गत नोंदणी सुरू झाली आहे. सीसीआयअंतर्गत ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीत १९५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांनी एसएमएस आल्यानंतर बाजार समितीच्या मार्केट यार्डावर कापूस विक्रीसाठी आणताना सोबत सात बारा उतारा, आधार कार्ड, बॅंक खाते पुस्तक यांच्या सत्यप्रती घेऊन याव्यात. चुकारे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केले जातील. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून यावे, असे आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले आहे.

बोरी येथे खरेदी केंद्र सुरू करावे
जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांध्ये सीसीआयतर्फे आणि पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. परंतु बोरी (ता. जिंतूर) कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तूर्त शासकीय खरेदी केंद्रांचे नियोजन दिसत नाही.त्यामुळे बोरी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जिंतूर येथील केंद्रावर कापूस विक्रीसाठी न्यावा लागत आहे. त्यासाठी वाहन भाड्यासह अन्य खर्चाचा भुर्दंड बसत आहे. बोरी येथे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...