Agriculture news in Marathi Purchase of 24 lakh quintals of cotton in Aurangabad | Agrowon

औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

औरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय), खासगी बाजार पेठ, पणन परवानाधारक बाजार समिती आणि अनुज्ञप्ती धारक व्यापारी आदींच्या माध्यमातून २४ लाख ९२ हजार ११० क्विंटल ७ किलो कापसाची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय), खासगी बाजार पेठ, पणन परवानाधारक बाजार समिती आणि अनुज्ञप्ती धारक व्यापारी आदींच्या माध्यमातून २४ लाख ९२ हजार ११० क्विंटल ७ किलो कापसाची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

कापूस पणन महासंघाच्या वतीने कोरोना संकटापूर्वी २२४३७ शेतकऱ्यांकडून ६ लाख २७ हजार ७१८ क्विंटल ४० किलो कापसाची हमी दराने खरेदी करण्यात आली होती. कोरोना संकटानंतर ५५९१ शेतकऱ्यांकडून १ लाख ८१ हजार ७१० क्विंटल ८ किलो कापसाची खरेदी करण्यात आली. सीसीआयकडून कोरोना संकटापूर्वी १०८५० शेतकऱ्यांकडील ३ लाख ३७ हजार ३२ क्विंटल तर कोरोना संकटानंतर २६१२ शेतकऱ्यांकडील ७८ हजार ३०१ क्विंटल ६३ किलो कापसाची हमी दराने खरेदी करण्यात
आली.

जिल्ह्यातील खासगी बाजारातून ४२ हजार ४२४ शेतकऱ्यांकडील १० लाख ६५ हजार ४१५ क्विंटल ३० किलो, थेट पणन परवानाधारकांना कडून ३०९८ शेतकऱ्यांकडील ६१ हजार ९७३ क्विंटल तर बाजार समितीमधील अनुज्ञप्ती धारक व्यापाऱ्यांकडून ६६३० शेतकऱ्यांकडील १ लाख ३९ हजार ९५९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. १० जुलै अखेर जवळपास १७०५ शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करणे बाकी असल्याचा अहवाल होता. त्यांच्याकडीलही कापूस खरेदी गतीने सुरू
होती.

जिल्ह्यातील कापूस शिल्लक असलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या कापूस खरेदीसाठी घेऊन येण्याबाबत कळविण्यात आले होते. तर पैठण, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, गंगापूर, लासुर स्टेशन येथील कापूस खरेदी आटोपली होती, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

कापूस खरेदी आटोपलेल्या ठिकाणी कापूस शिल्लक असलेल्या केंद्राअंतर्गत कापूस पाठवून खरेदी गतीने करण्याचा प्रयत्न केला. कापूस खरेदी आता अंतिम टप्प्यात आहे.
- अनिलकुमार दाबशेडे,
जिल्हा उपनिबंधक, औरंगाबाद


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...