Agriculture news in marathi Purchase of 2.5 lakh quintals of cotton at eight centers in Nanded | Agrowon

नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख क्विंटल कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

नांदेड : सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची कापूस खरेदी पूर्ण झाली आहे. आठ शासकीय केंद्रांवर शुक्रवार (ता.२४) अखेर जिल्ह्यातील १२ हजार ४  शेतकऱ्यांचा २ लाख ५४ हजार ३३ क्विंटल कापूस खरेदी झाला.

नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची कापूस खरेदी पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आठ शासकीय केंद्रांवर शुक्रवार (ता.२४) अखेर जिल्ह्यातील १२ हजार ४  शेतकऱ्यांचा २ लाख ५४ हजार ३३ क्विंटल कापूस खरेदी झाला. कोरोनापूर्वी आणि नंतर एकूण ५१ हजार ८७७ शेतकऱ्यांच्या ११ लाख १५ हजार २८५ क्विंटल कापसाची खरेदी केली, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय खरेदी केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी गुगल लिंकव्दारे ऑनलाइन, कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे ऑफलाइन मिळून ३९ हजार ८४८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, घरी जाऊन केलेल्या पडताळणी दरम्यान ९ हजार ४५० शेतकऱ्यांकडे सुमारे २ लाख ५ हजार ४३४ क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे आढळून आले होते.

राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या (फेडरेशन) तामसा (ता. हदगाव), पोमनाळा (ता. भोकर), भोकर  आणि भारतीय कापूस महामंडळच्या (सीसीआय) कलदगाव (ता. अर्धापूर), धर्माबाद, कुंटूर, नायगाव या सात केंद्रांवरील कापूस खरेदी पूर्ण झाली आहे. किनवट येथे जागेअभावी खरेदी बंद होती. बिलोली येथे कामगार उपलब्ध नसल्यामुळे खरेदी होऊ शकली नाही. शुक्रवार (ता.२४) पर्यंत जिल्ह्यातील आठ केंद्रांवर १ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या २ लाख ५४ हजार ३३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्यात कापूस उत्पादक पणन महासंघाच्या ४ हजार ५९४ शेतकऱ्यांचा १ लाख ९ हजार ७४९ क्विंटल आणि ‘सीसीआय’च्या ७ हजार ४१० शेतकऱ्यांच्या १ लाख ४४ हजार २८३  क्विंटल कापूस खरेदीचा समावेश आहे.

कोरोनापूर्वी साडेआठ लाख क्विंटलची खरेदी

जिल्ह्यात लॉकडाऊनपूर्वी कापूस पणन महासंघ, सीसीआय, खासगी बाजार, थेट पणन परवानाधारक, कृषी उत्पन्न बाजार समित्याअंतर्गतच्या व्यापाऱ्यांतर्फे एकूण ३९ हजार ८७३ शेतकऱ्यांचा ८ लाख ६१ हजार २५२.७१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

कोरोनाकालीन कापूस खरेदी (क्विंटलमध्ये)

केंद्र  शेतकरी संख्या कापूस
तामसा ११८० २३८१५
पोमनाळा  २३२१ ६१००९
भोकर  १०९३ २४९२५
कलदगाव १८६३ ४२९१४
कुटुंर  १३१२ १९१६६
नायगाव १९०९ ४१५०१
धर्माबाद १७८० २७१८१
किनवट ५४६  १३५१०

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...