दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
जालना जिल्ह्यातील दोन केंद्रांत अडीच लाख क्विंटलवर कापूस खरेदी
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार जालना येथील दोन केंद्रांत भारतीय कापूस निगम (सीसीआय) कडून ९१६३ शेतकऱ्यांकडील २ लाख ६७ हजार ८३ क्विंटल ६५ किलो कापसाची खरेदी करण्यात आली.
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार जालना येथील दोन केंद्रांत भारतीय कापूस निगम (सीसीआय) कडून ९१६३ शेतकऱ्यांकडील २ लाख ६७ हजार ८३ क्विंटल ६५ किलो कापसाची खरेदी करण्यात आली.
२२ जानेवारी अखेरपर्यंत जालना बाजार समितीच्या केंद्रात ५७३५ शेतकऱ्यांकडून १ लाख ८४ हजार ६५७ क्विंटल ९ किलो, तर उपबाजार बदनापूर येथील केंद्रात ३४२८ शेतकऱ्यांकडील ८२ हजार ४२५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी तूर्त पुढील आदेशापर्यंत कापूस घेऊन न येण्याची सूचना जालना बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी केली आहे.
तूर्त खरेदी थांबली
‘सीसीआय’च्या वतीने २५ जानेवारीपासून जालना बाजार समितीच्या केंद्रातील कापूस खरेदी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. सरकी व गठाणचा स्टॉक जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे व गठाण ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध नसल्याने ही खरेदी थांबविल्याचे ‘सीसीआय’ने कळविल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे.
- 1 of 1054
- ››