Agriculture news in Marathi Purchase of 28,000 quintals of gram in Parbhani, Hingoli | Agrowon

परभणी, हिंगोलीत २८ हजार क्विंटल हरभरा खरेदी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत परभणी, हिंगोली जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ यांच्यातर्फे १३ केंद्रांवर २ हजार १०९ शेतकऱ्यांचा २८ हजार ६८० क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. तर या दोन जिल्ह्यांतील १४ खरेदी केंद्रावर ११ हजार ७१२ शेतकऱ्यांची ९७ हजार ६२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत परभणी, हिंगोली जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ यांच्यातर्फे १३ केंद्रांवर २ हजार १०९ शेतकऱ्यांचा २८ हजार ६८० क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. तर या दोन जिल्ह्यांतील १४ खरेदी केंद्रावर ११ हजार ७१२ शेतकऱ्यांची ९७ हजार ६२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

परभणी जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी, जिंतूर, बोरी, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या ७ केंद्रांवर हमीभावाने हरभरा विक्रीसाठी ८ हजार ९८१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी परभणी, बोरी, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ५ केंद्रांवर शुक्रवार (ता. २२) पर्यंत ५९० शेतकऱ्यांचा ७ हजार ३५७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

राज्य सहकारी पणन महासंघातर्फे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या ६ केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी ८ हजार ३७५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.त्यापैकी १ हजार १६० शेतकऱ्यांचा १७ हजार १४६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील मानवत आणि गंगाखेड या २ केंद्रावर हरभरा विक्रीसाठी ३ हजार ७६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३५९ शेतकऱ्यांचा ४ हजार १७६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

९७ हजार ेक्विंटल तुरीची खरेदी
परभणी जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या ६ केंद्रांवर नोंदणी केलेल्या २४ हजार २२८ पैकी ३ हजार ५७३ शेतकऱ्यांची ३० हजार ७९५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील ६ केंद्रावर नोंदणी १३ हजार ९४५ पैकी ४ हजार ८२१ शेतकऱ्यांची ४१ हजार ७३३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रावर नोंदणी केलेल्या ५ हजार ३३ पैकी ३ हजार ३१८ शेतकऱ्यांची २४ हजार ५३४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

परभणी-हिंगोली जिल्हा हरभरा खरेदी (क्विंटलमध्ये)  
खरेदीदार केंद्र संख्या खरेदी शेतकरी संख्या
राज्य सह. पणन महासंघ ११ २४५०४ १७५०
विदर्भ सह. पणन महासंघ ४१७६ ३५९
परभणी- हिंगोली जिल्हा तूर खरेदी (क्विंटलमध्ये)
खरेदीदार केंद्र संख्या खरेदी शेतकरी संख्या
राज्य सह.पणन महासंघ १२ ७२५२८ ८३९४
विदर्भ सह.पणन महासंघ २४५३४ ३३१८

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...