नांदेड जिल्ह्यात २९ हजार क्विंटल तुरीची खरेदी

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य सहकारी पणन महासंघाच्या ६ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या ३ मिळून एकूण ९ खरेदी केंद्रांवर शुक्रवार (ता. १९) पर्यंत ८ हजार ९९१ शेतकऱ्यांचा १ लाख ५४ हजार ७९६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. तसेच या नऊ केंद्रांवर ६ हजार ५०१ शेतकऱ्यांची २९ हजार ८८६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, या बाबत सूत्रांनी माहिती दिली.
Purchase of 29,000 quintals of trumpets in Nanded district

हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नांदेड जिल्ह्यतील राज्य सहकारी पणन महासंघाच्या नांदेड, हदगाव, किनवट, बिलोली, देगलूर, मुखेड या सहा तसेच विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या भोकर, धर्माबाद, नायगा या तीन केंद्रांवर एकूण २४ हजार २०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ८ हजार ९९१ शेतकऱ्यांचा १ लाख ५४ हजार ७९६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

तीन केंद्रांवर १३ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी तूर विक्रीसाठी राज्य सहकारी पणन महासंघाच्या सहा आणि विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या तीन केंद्रांवर १३ हजार २६६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ६ हजार ५०१ शेतकऱ्यांची २९ हजार ८८६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यात नांदेड केंद्रावर ५३८ शेतकऱ्यांची ३ हजार ३०१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. मुखेड केंद्रावर १ हजार ८१ शेतकऱ्यांची ५ हजार ३०० क्विंटल, किनवट केंद्रावर १ हजार ५८० शेतकऱ्यांची ४ हजार ९९० क्विंटल, बिलोली केंद्रावर ६२ शेतकऱ्यांची ३९० क्विंटल, देगलूर केंद्रावर १ ४८ शेतकऱ्यांची १ हजार १७९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. भोकर केंद्रावर ३५१ शेतकऱ्यांची १ हजार १३५ क्विंटल, धर्माबाद केंद्रावर ८७० शेतकऱ्यांची ४ हजार ६९२ क्विंटल, नायगाव केंद्रावर ८०९ शेतकऱ्यांची ३ हजार ८८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

केंद्रनिहाय हरभरा खरेदी क्विंटलमध्ये
केंद्र शेतकरी संख्या हरभरा खरेदी
नांदेड १३२९ २२०६४
हदगाव ११५१ १९३६३
किनवट ११९२ २१३२०
बिलोली १०९४ १८४१७
देगलूर १००० १८२४२
मुखेड ६४१ ११०६२
भोकर २७९ ४४३८
धर्माबाद १६४५ २८७२८
नायगाव २५८४ ४४३२७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com