Agriculture news in Marathi Purchase of 30,000 quintals of gram in Khandesh | Agrowon

खानदेशात ३० हजार क्विंटल हरभरा खरेदी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

बाजारातील दरांच्या तुलनेत शासकीय दर अधिक आहेत. शिवाय शासकीय केंद्रात विक्रीसाठी नोंदणीही बऱ्यापैकी झाली होती. यामुळे खानदेशात गेल्या आठ दिवसांत सुमारे ३० हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे.

जळगाव ः खानदेशात शासकीय हरभरा खरेदीला वेग आला आहे. बाजारातील दरांच्या तुलनेत शासकीय दर अधिक आहेत. शिवाय शासकीय केंद्रात विक्रीसाठी नोंदणीही बऱ्यापैकी झाली होती. यामुळे खानदेशात गेल्या आठ दिवसांत सुमारे ३० हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात १४, धुळ्यात चार, नंदुरबारात सहा हरभरा खरेदी केंद्र सुरू आहेत. यात जळगाव जिल्ह्यात १७ हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. तर नंदुरबारात सात हजार क्विंटल आणि धुळ्यातही सुमारे सहा हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. खरेदीला या आठवड्यात वेग आला आहे. जिल्ह्यात सुरुवातीला फक्त १३ खरेदी केंद्र सुरू होते. बोदवड येथील केंद्र बंद होते. पण हे केंद्रदेखील गेल्या आठवड्याच्या अखेरीस सुरू झाले.

या केंद्रातही हरभऱ्याची सुमारे दोन हजार क्विंटल आवक झाली आहे. जळगाव, चोपडा, रावेर येथील हरभरा खरेदी केंद्रात अधिकची खरेदी झाली आहे. धुळ्यात शिरपूर येथे खरेदीला प्रतिसाद अधिक मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली होती. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे १० हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

हरभरा खरेदीसाठी मर्यादित संख्येत शेतकऱ्यांना बोलावले जात आहे. जेथे गोदाम निश्‍चित केले आहे. तेथेच हरभऱ्याची तोलाई केली जाते. यामुळे थेट गोदामात हरभरा मागवून घेतला जात आहे. काही गोदामे शेतकऱ्यांना लांब पडत असल्याने वाहतूक खर्च अधिकचा येत आहे, अशी माहिती मिळाली. बारदानाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने खरेदीत अडचणी नाहीत. हरभरा खरेदीची रोजची मर्यादा प्रत्येक केंद्रात कोरोनामुळे निश्‍चित केली आहे. यामुळे खरेदी लवकर पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे.


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...