माळशिरस, करमाळ्यात मक्याची ३० हजार क्विंटल खरेदी

सोलापूर ः माळशिरस तालुक्यात अकलूज व नातेपुते येथील मका हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली. या केंद्रांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक खरेदी झाली आहे.
 Purchase of 30,000 quintals of maize in Malshiras, Karmala
Purchase of 30,000 quintals of maize in Malshiras, Karmala

सोलापूर  ः अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात अकलूज व नातेपुते येथील मका हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली. या केंद्रांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक खरेदी झाली आहे. माळशिरस आणि करमाळा तालुक्यात १२४० शेतकऱ्यांची ५ कोटी ३५ लाख ७ हजार ५२० रुपये किंमतीची ३०४०२ क्विंटल मका खरेदी करण्यात आली. 

चालू हंगामामध्ये मक्‍याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्या आधी मका खरेदी केंद्रांना खरेदीची मर्यादा घालून दिल्याने आणि ही मर्यादा संपल्याने खरेदी केंद्र बंद होते. परंतु, नंतर राज्य शासनाने खरेदीची मर्यादा वाढवून दिल्याने पुन्हा ही केंद्रे सुरु झाली. त्यानंतर मक्याच्या खरेदीला आणखी गती मिळाली. त्याचा फायदा माळशिरस आणि करमाळ्यातील शेतकऱ्यांनी घेतला. या दोन्ही तालुक्यात सर्वाधिक दूग्धोत्पादन व्यवसाय चालतो, या भागात मक्याचे सर्वाधिक उत्पादन होते.  

शेतकऱ्यांचा प्रतिसाद 

सध्या बाजारपेठेमध्ये मक्याला १३०० ते १३५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर, खरेदी केंद्रांकडून १७६६ रुपये प्रतिक्विंटल दर मिळतो आहे. हमीभाव खरेदी केंद्रांमध्ये सध्याच्या बाजारभावापेक्षा ४०० ते ४५० रुपये अधिक दर मिळत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचाही प्रतिसाद चांगला मिळाल्याचे सांगण्यात आले. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना सुमारे एक कोटी २५ लाखांचा अधिकचा फायदा झाला. 

खात्यांवर पैसे जमा

अकलूज खरेदी केंद्राकडे ८३१ शेतकऱ्यांची २१ हजार ३४२ क्विंटल ५ किलो मका खरेदी झाली. तर, नातेपुते केंद्राकडे ४०९ शेतकऱ्यांची ९ हजार ५९ क्विंटल ५० किलो मक्‍याची खरेदी झाली. यापैकी नातेपुते केंद्रावरील सर्व शेतकऱ्यांचे पैसे बँक खात्यांत जमा झाले आहेत. अकलूज केंद्रांवरील पैसेही दोन दिवसांत जमा होतील, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com