जालना जिल्ह्यातील केंद्रांवर ३२ हजार ६३१ क्विंटल तुरीची खरेदी

जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून ३ हजार ९०६ शेतकऱ्यांकडील ३२ हजार ६३१ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील केंद्रांवर ३२ हजार ६३१ क्विंटल तुरीची खरेदी
जालना जिल्ह्यातील केंद्रांवर ३२ हजार ६३१ क्विंटल तुरीची खरेदी

जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून ३ हजार ९०६ शेतकऱ्यांकडील ३२ हजार ६३१ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.  

जिल्ह्यात जालना, अंबड, तीर्थपुरी, मंठा, भोकरदन, परतूर ही सहा केंद्रे तूर खरेदीसाठी मंजूर करण्यात आली. या केंद्रांवरून ७ हजार ३०९ शेतकऱ्यांनी आपली तूर खरेदी करण्यासाठी नोंदणी केली होती. त्यात जालना केंद्रावरील ३००६, अंबड ८४०, तीर्थपुरी ११८८, मंठा १३६४, भोकरदन ८३ व परतूर केंद्रावरील २८ शेतकऱ्यांचा समावेश होता. या सर्व शेतकऱ्यांना खरेदीसाठीचे संदेश पाठवण्यात आले. त्यापैकी ३९०६ शेतकऱ्यांनी आपली ३२ हजार ६३० क्विंटल तुर खरेदीसाठी आणली. त्यांपैकी २ हजार २२२ शेतकऱ्यांना त्यांच्या खरेदी केलेल्या तूरीचे चुकारे देण्यात आले. तर, १६८४ शेतकऱ्यांना चुकारे देणे बाकी आहे. 

जिल्ह्यातील सहा केंद्रांवर हरभरा खरेदीसाठी ६ हजार ३९५ शेतकऱ्यांनी नोंद केली. यापैकी १ हजार ६२६ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीचे संदेश पाठविण्यात आले. त्यांपैकी १०७८ शेतकऱ्यांकडून १३१३२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली. 

औरंगाबाद येथे ५०२० क्विंटल तूरीची खरेदी  

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, जाधववाडी, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव या नाफेडच्या ६ खरेदी केंद्रांवरून १३७९ शेतकऱ्यांनी तुरीची नोंदणी केली होती. या सर्वांना खरेदीसाठीचे संदेश पाठविण्यात आले. त्यापैकी ९०७ शेतकऱ्यांकडील ५ हजार २० क्विंटल ५० किलो तूर चार केंद्रांवरुन खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील ६ केंद्रांवर ६८५ शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या खरेदीसाठी नोंदणी केली. कन्नड वगळता पाच केंद्रांवरील ३२९ शेतकऱ्यांना हमी दराने हरभरा खरेदी साठीचे संदेश पाठविण्यात आले. त्यापैकी १८० शेतकऱ्यांकडून १८६५ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची गंगापूर, खुलताबाद व सोयगाव येथील केंद्रांवर खरेदी करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या औरंगाबाद जिल्हा कार्यालयातर्फे देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com