सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल भात खरेदी

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ३६ हजार ८८२ क्विंटल भात खरेदी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ११ क्विंटलने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २ हजार ५५० रूपये दर शासनाने निश्‍चित केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दरातही २०० रुपयांनी वाढ झाली आहे.
Purchase of 37,000 quintals of paddy in Sindhudurg district
Purchase of 37,000 quintals of paddy in Sindhudurg district

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ३६ हजार ८८२ क्विंटल भात खरेदी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ११ क्विंटलने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २ हजार ५५० रूपये दर शासनाने निश्‍चित केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दरातही २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र भात लागवडीखाली आहे. साधारणपणे ६८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. मनुष्यबळाचा अभाव, आर्थिकदृष्ट्या न बसणारा ताळमेळ, भातविक्रीला मिळणारा नगण्य दर यामुळे भातशेतीचे क्षेत्र मागील काही वर्षांत कमी झाले आहे. परंतु मागील दोन तीन वर्षांत शासनाने यांत्रिकीकरणावर दिलेला भर, भाताच्या दरात झालेली सुधारणा यामुळे आता पुन्हा भातशेतीत शेतकरी उतरू लागला आहे. गेल्यावर्षी नैसर्गिक आपत्तीच्या चक्रात भातशेती अडकली होती. तरीदेखील अनेक शेतकऱ्यांनी या संकटावर मात करीत भातशेतीचे चांगले उत्पादन घेतले.

जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून भातखरेदी केली जाते. जिल्ह्यात भातखरेदी करिता १६ केंद्रे निर्माण करण्यात आली होती. यापूर्वी मार्चमध्ये या खरेदीला प्रारंभ केला जात होता. परंतु यावर्षी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जानेवारीतच खरेदीला सुरुवात झाली.जिल्ह्यातील १६ खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत ३६ हजार ८८२ क्विंटल भात खरेदी झाली आहे.

यावर्षी शासनाने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १ हजार ८५० अधिक ७०० रुपये बोनस असा २ हजार ५५० रुपये दर निश्‍चित केला आहे.गेल्यावर्षी हा २ हजार ३०० रुपये होता. दरम्यान जिल्ह्यात सर्वाधिक भात उत्पादन कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात घेतले जाते.त्यामुळे सर्वाधिक भातखरेदी देखील कुडाळ तालुक्याची असून १८ हजार क्विंटल भात खरेदी झाली आहे.

खरेदीची स्थिती

  • भातशेती क्षेत्र-६८ हजार ५०० हेक्टर
  • भातखरेदी-३६ हजार ८८२ क्विंटल
  • भातखरेदी केंद्रे-१६
  • भाताला मिळालेला दर-२५५० रूपये (प्रतिक्विंटल)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com