नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा खरेदी 

​ नांदेड जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू करण्यात आलेल्या ३६ हरभरा खरेदी केंद्र पैकी २२ खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. या २२ खरेदी केंद्रावर आजअखेर ३ हजार १९५ शेतकऱ्यांचा ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा खरेदी झाली.
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा खरेदी Purchase of 42 thousand 649 quintals of gram in Nanded
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा खरेदी Purchase of 42 thousand 649 quintals of gram in Nanded

नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू करण्यात आलेल्या ३६ हरभरा खरेदी केंद्र पैकी २२ खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. या २२ खरेदी केंद्रावर आजअखेर ३ हजार १९५ शेतकऱ्यांचा ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा खरेदी झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली. 

जिल्ह्यात केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार हरभरा खरेदी करण्यासाठी दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनकडून नऊ, विदर्भ को-ऑपरेटिव्ह स्टेशनकडून चार तर महाफार्मर प्रोड्यूसर कंपनीकडून तेवीस खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली होती.

परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली नसल्यामुळे ३६ पैकी २२ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले. यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या नऊपैकी सात, विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या चार पैकी दोन तर महाफार्मर्स प्रोडूसर कंपनीच्या २३ पैकी ११ ठिकाणी हरभरा खरेदी करण्यात आला. आजपर्यंत केंद्र सुरू असलेल्या खरेदी केंद्रावर ३ हजार १९५ शेतकऱ्यांचा ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. या खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना हरभऱ्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून मिळाली.  तीन यंत्रणांचे २२ खरेदी केंद्र सुरू  महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या सात खरेदी केंद्रावर ९७५ शेतकऱ्यांचा ११ हजार ८८३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या दोन खरेदी केंद्रावर १०१२ शेतकऱ्यांचा १३ हजार ६३२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. तर महाफार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या अकरा खरेदी केंद्रावर एक हजार आठ शेतकऱ्यांचा १७ हजार १७६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com