Agriculture news in marathi Purchase of 42 thousand 649 quintals of gram in Nanded | Agrowon

नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा खरेदी 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

नांदेड जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू करण्यात आलेल्या ३६ हरभरा खरेदी केंद्र पैकी २२ खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. या २२ खरेदी केंद्रावर आजअखेर ३ हजार १९५ शेतकऱ्यांचा ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा खरेदी झाली. 

नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू करण्यात आलेल्या ३६ हरभरा खरेदी केंद्र पैकी २२ खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. या २२ खरेदी केंद्रावर आजअखेर ३ हजार १९५ शेतकऱ्यांचा ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा खरेदी झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली. 

जिल्ह्यात केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार हरभरा खरेदी करण्यासाठी दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनकडून नऊ, विदर्भ को-ऑपरेटिव्ह स्टेशनकडून चार तर महाफार्मर प्रोड्यूसर कंपनीकडून तेवीस खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली होती.

परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली नसल्यामुळे ३६ पैकी २२ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले. यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या नऊपैकी सात, विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या चार पैकी दोन तर महाफार्मर्स प्रोडूसर कंपनीच्या २३ पैकी ११ ठिकाणी हरभरा खरेदी करण्यात आला. आजपर्यंत केंद्र सुरू असलेल्या खरेदी केंद्रावर ३ हजार १९५ शेतकऱ्यांचा ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. या खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना हरभऱ्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून मिळाली. 

तीन यंत्रणांचे २२ खरेदी केंद्र सुरू 
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या सात खरेदी केंद्रावर ९७५ शेतकऱ्यांचा ११ हजार ८८३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या दोन खरेदी केंद्रावर १०१२ शेतकऱ्यांचा १३ हजार ६३२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. तर महाफार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या अकरा खरेदी केंद्रावर एक हजार आठ शेतकऱ्यांचा १७ हजार १७६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. 
 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...