यवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची खरेदी 

यवतमाळजिल्ह्यातकापूस हंगामात आजपर्यंत एकूण दोन लाख ४५ हजार ४५४ कापूस उत्पादकांकडून ५० लाख २७ हजार १७२ क्विंटल कापूस खरेदी केला आहे.
Purchase of 50 lakh quintals of cotton in Yavatmal district
Purchase of 50 lakh quintals of cotton in Yavatmal district

यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस पाच जूनपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे. कापूस हंगामात आजपर्यंत एकूण दोन लाख ४५ हजार ४५४ कापूस उत्पादकांकडून ५० लाख २७ हजार १७२ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊन काळात २४ मार्च ते दोन मेपर्यंत कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

लॉकडाऊन कालावधीमुळे कापूस खरेदीबाबत सूक्ष्म नियोजन करून २० ते ३० एप्रिलदरम्यान एकूण ३० हजार ८७६ उत्पादकांनी बाजार समित्यांमध्ये नोंदणी केली. जिल्ह्यातील एकूण ५२ जिनिंगपैकी ४४ जिनिंग हे सीसीआय व कॉटन फेडरेशन यांच्यासोबत करारबद्घ होते. परंतु लॉकडाऊनमुळे परप्रांतात मजूर गेल्यामुळे २८ जिनींग तातडीने सुरू करण्यात आले असून, पुन्हा कापूस खरेदी सरू केली. २२ मेपर्यंत एकूण १२ हजार नोंदणीकृत कापूस उत्पादकाकडून तीन लाख १९ हजार ५३४ क्विंटल कापूस सीसीआय व कापूस फेडरेशनने खरेदी केला. 

खासगी खरेदी धारकांमार्फत दोन लाख ७० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. आज अखेर एकूण १७ हजार ४३२ कापूस उत्पादकांचा माल खरेदी करणे बाकी आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. पाच जूनपर्यंत दररोज ९०० वाहनानुसार कापूस खरेदी करण्यात येईल. यानुसार अंदाजे चार लाख ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी अपेक्षित आहे, अशी माहिती उपजिल्हा निबंधक, सहकारी संस्था यांनी दिली आहे. 

हंगामात एकूण ४९ हजार ९१२ शेतकऱ्यांनी तूर नोंदणी केली असून आजपर्यंत जिल्ह्यातील १६ केंद्रावर ९६ हजार ३०६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तसेच एकूण सहा हजार ५११ शेतकऱ्यांकडून चणा विक्रीची नोंदणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण ४९ हजार ६४२ क्विंटल चणा खरेदी करण्यात आला आहे. १५ जूनपूर्वी नऊ हजार क्विंटल चना खरेदी करण्यात येईल. 

तर चुकारे थांबविणार  जिल्ह्यात २० मे पासून तालुकास्तरावर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे कापसाचा साठा असेल अशा उत्पादकांना बाजार समितीमार्फत टोकन देऊन कापूस खरेदी बाबत एसएमएस पाठविण्यात येईल. सीसीआयच्या निकषानुसार ४० क्विंटलच्यावर एका शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करता येत नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याचा कापूस आपल्या नावावर विक्री करू नये. तसे आढळून आल्यास त्या कापसाचे चुकारे थांबविण्यात येतील, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

व्हीसीद्वारे आढावा  मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिसीद्वारे आढावा घेण्यात आला. खरेदीबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी माहिती दिली. जिल्ह्यातील कर्जवाटप, कापूस खरेदी, चणा व तूर खरेदी याबाबत शेतकऱ्यांनी कोणत्याही भुलथापास बळी पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री राठोड यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com