परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ९१४८ क्विंटल हरभरा खरेदी

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ६ आणि हिंगोली जिल्ह्यातील ४ केंद्रांवर असे एकूण १० केंद्रांवर बुधवार (ता. २४) पर्यंत १ हजार ४७ शेतकऱ्यांचा ९ हजार १४८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.
Purchase of 9148 quintals of gram in Parbhani, Hingoli district
Purchase of 9148 quintals of gram in Parbhani, Hingoli district

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ६ आणि हिंगोली जिल्ह्यातील ४ केंद्रांवर असे एकूण १० केंद्रांवर बुधवार (ता. २४) पर्यंत १ हजार ४७ शेतकऱ्यांचा ९ हजार १४८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

दोन जिल्ह्यातील १५ केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी १५ हजार ८४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या ७ केंद्रावर ६ हजार ७७१ शेतकऱ्यांनी आणि हिंगोली जिल्ह्यातील ६ केंद्रांवर ६ हजार ५८७  शेतकऱ्यांचा समावेश आहे.त्यापैकी परभणी जिल्ह्यातील १ हजार २३५ आणि हिंगोली जिल्ह्यातील १ हजार ६१२ नोंदणीकृत शेतकऱ्यांना केंद्रावर हरभरा विक्रीस आणण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले आहेत.

बुधवार (ता. २४) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ४ केंद्रांवर २६७ शेतकऱ्यांचा २ हजार ६८२ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यातील ४ केंद्रावर २८७ शेतकऱ्यांचा ४ हजार ८७७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, सोनपेठ, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, साखरा या पाच केंद्रांवर खरेदी सुरू झालेली नाही, असे जिल्हा व्यवस्थापक के. जे. शेवाळे यांनी सांगितले. विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रावर ४९३ शेतकऱ्यांचा ५ हजार ५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

हमीभाव खरेदी केंद्र सुरू ठेवा... संचारबंदीमुळे खुल्या बाजारातील शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे हरभऱ्याच्या दरात घसरण झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नियम पाळून तसेच योग्य ती दक्षता घेऊन शासकीय खरेदी केंद्र सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com