Purchase of 96,000 quintals of cotton in Nanded till Wednesday
Purchase of 96,000 quintals of cotton in Nanded till Wednesday

नांदेडमध्ये बुधवारपर्यंत ९६ हजारांवर क्विंटल कापूस खरेदी

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन लिंकव्दारे सोमवार (ता.२५) पर्यत प्राथमिक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले.

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन लिंकव्दारे सोमवार (ता.२५) पर्यत प्राथमिक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले. 

यापूर्वी हमीभावाने कापूस विक्री ऑनलाइन नोंदणीसाठी शनिवार (ता.२५ एप्रिल) पर्यंत दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील २८ हजार २१६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. भारतीय कापूस निगम (सीसीआय) च्या कलदगाव (ता.अर्धापूर), किनवट, धर्माबाद, नायगाव, कुंटूर या ५ केंद्रांवर आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ (फेडरेशन) च्या हदगाव, भोकर, पोमनाळा (ता.भोकर) या ३ केंद्रांवर बुधवारपर्यंत ४ हजार ९९३ नोंदणीकृत शेतकऱ्यांचा ९६ हजार ३५६ क्विंटल कापूस खरेदी झाला. 

जिल्ह्यात अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन लिंकवर प्राथमिक नोंदणी केलेली नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन कापूस विक्रीसाठी नोंदणीसाठी लिंक सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे ऑनलाईन लिंक पुन्हा सुरू करण्यात येत आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना संबंधित बाजार समितीकडून लघु संदेश पाठविण्यात येईल. त्यात नमूद दिनांकाला शेतकऱ्यांनी सातबारावरील पीक पेरा, उत्पादकता विचारात घेऊन फक्त एफएक्यु दर्जाचा कापूस संबंधित खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावयाचा आहे. 

कापूस विकलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर पुन्हा खरेदी केली जाणार नाही. नॉन एफएक्यु (Non FAQ) दर्जाचा कापसाच्या खरेदीसाठी बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी तसेच खाजगी बाजार समित्यांना परवानगी देण्यात आली आहे. खरेदी प्रक्रिया सुरळीत चालावी, यासाठी राज्याच्या पणन संचालकांनी तालुका स्तरावर सहकारी संस्थाचे उप, सहायक निबंधक, पणन महासंघाचे प्रतिनिधी, बाजार समितीचा सचिव यांची समिती स्थापन केली आहे, असे फडणीस यांनी सांगितले.  तालुका निहाय ऑनलाईन लिंक 

नांदेड,अर्धापूर,मुदखेड ःhttps://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSeQJTeiXq२३८EALuS६dKeeFymetSi_UVGomZlmDf१rN७LjQYA/viewform?usp=sf_link  माहूर ःhttps://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSdzcWe३QebRrQsdsIlMVulNoE०D१lWNY६४०OUdzfvAVGLi-Zg/viewform?usp=sf_link  किनवट ः https://forms.gle/२cK६Jq४KJcx३iSeN७  कंधार, लोहा ःhttps://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSeEQfYAAhXbiMJMiQj६CuT२vL०uDw६Xeq१eUc२२८fwJ४kuw०A/viewform  नायगाव, बिलोली https://forms.gle/७५pkzNgvSPeSVJ१w५  मुखेड ःhttps://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLScTAtU_P३UtS३mv८Saa८VUu_XP_८WQr_२cCrmw८yPXpo७qYKQ/viewform?usp=sf_link  धर्माबाद ः https://forms.gle/p६TsjVDRXjKTBSpR६  उमरी ः https://forms.gle/६z५EJs९४२vzyj५NdA  हदगाव, हिमायतनगर ःhttps://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSeKzK४j५wB९C०NLZ४९१EAV२Bu__dGFiYWI६aQDBGY१v३YomIA/viewform?vc=०&c=०&w=१  भोकर ःhttps://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSeFWNzoqbxLAHF७xSWIrf४EiCNKrx१H६fNFsM_f-wBzqaLo८w/viewform  देगलूर ः https://drive.google.com/openid=१९v५BUv४Mu६LKZaZbTmQLMa७KUd६xnFZgZyinbrr७PlQ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com