agriculture news in marathi Purchase of 96,000 quintals of cotton in Nanded till Wednesday | Page 2 ||| Agrowon

नांदेडमध्ये बुधवारपर्यंत ९६ हजारांवर क्विंटल कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन लिंकव्दारे सोमवार (ता.२५) पर्यत प्राथमिक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले. 

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन लिंकव्दारे सोमवार (ता.२५) पर्यत प्राथमिक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले. 

यापूर्वी हमीभावाने कापूस विक्री ऑनलाइन नोंदणीसाठी शनिवार (ता.२५ एप्रिल) पर्यंत दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील २८ हजार २१६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. भारतीय कापूस निगम (सीसीआय) च्या कलदगाव (ता.अर्धापूर), किनवट, धर्माबाद, नायगाव, कुंटूर या ५ केंद्रांवर आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ (फेडरेशन) च्या हदगाव, भोकर, पोमनाळा (ता.भोकर) या ३ केंद्रांवर बुधवारपर्यंत ४ हजार ९९३ नोंदणीकृत शेतकऱ्यांचा ९६ हजार ३५६ क्विंटल कापूस खरेदी झाला. 

जिल्ह्यात अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन लिंकवर प्राथमिक नोंदणी केलेली नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन कापूस विक्रीसाठी नोंदणीसाठी लिंक सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे ऑनलाईन लिंक पुन्हा सुरू करण्यात येत आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना संबंधित बाजार समितीकडून लघु संदेश पाठविण्यात येईल. त्यात नमूद दिनांकाला शेतकऱ्यांनी सातबारावरील पीक पेरा, उत्पादकता विचारात घेऊन फक्त एफएक्यु दर्जाचा कापूस संबंधित खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावयाचा आहे. 

कापूस विकलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर पुन्हा खरेदी केली जाणार नाही. नॉन एफएक्यु (Non FAQ) दर्जाचा कापसाच्या खरेदीसाठी बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी तसेच खाजगी बाजार समित्यांना परवानगी देण्यात आली आहे. खरेदी प्रक्रिया सुरळीत चालावी, यासाठी राज्याच्या पणन संचालकांनी तालुका स्तरावर सहकारी संस्थाचे उप, सहायक निबंधक, पणन महासंघाचे प्रतिनिधी, बाजार समितीचा सचिव यांची समिती स्थापन केली आहे, असे फडणीस यांनी सांगितले. 

तालुका निहाय ऑनलाईन लिंक 

नांदेड,अर्धापूर,मुदखेडhttps://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSeQJTeiXq२३८EALuS६dKeeFymetSi_UVGomZlmDf१rN७LjQYA/viewform?usp=sf_link 
माहूरhttps://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSdzcWe३QebRrQsdsIlMVulNoE०D१lWNY६४०OUdzfvAVGLi-Zg/viewform?usp=sf_link 
किनवटhttps://forms.gle/२cK६Jq४KJcx३iSeN७ 
कंधार, लोहा ःhttps://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSeEQfYAAhXbiMJMiQj६CuT२vL०uDw६Xeq१eUc२२८fwJ४kuw०A/viewform 
नायगाव, बिलोली https://forms.gle/७५pkzNgvSPeSVJ१w५ 
मुखेड ःhttps://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLScTAtU_P३UtS३mv८Saa८VUu_XP_८WQr_२cCrmw८yPXpo७qYKQ/viewform?usp=sf_link 
धर्माबादhttps://forms.gle/p६TsjVDRXjKTBSpR६ 
उमरीhttps://forms.gle/६z५EJs९४२vzyj५NdA 
हदगाव, हिमायतनगरhttps://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSeKzK४j५wB९C०NLZ४९१EAV२Bu__dGFiYWI६aQDBGY१v३YomIA/viewform?vc=०&c=०&w=१ 
भोकरhttps://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSeFWNzoqbxLAHF७xSWIrf४EiCNKrx१H६fNFsM_f-wBzqaLo८w/viewform 
देगलूरhttps://drive.google.com/openid=१९v५BUv४Mu६LKZaZbTmQLMa७KUd६xnFZgZyinbrr७PlQ 


इतर ताज्या घडामोडी
बारामतीत हमीभाव हरभरा खरेदी केंद्र सुरूपुणे ः शेतकऱ्यांच्या उत्पादित हरभऱ्यांला हमीभाव...
सेंद्रिय शेतीचे शेतकरी गटांना शेतातच...पुणे ः कृषी विभाग, आत्मा आणि बारामती कृषी विज्ञान...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्या ः...वाशीम ः कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा...
उजनी धरणातील पाणी पातळी उणे ११...सोलापूर ः सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी...
लातूरमध्ये १ लाख १४ हजार क्विंटलवर...लातूर : जिल्ह्यातील ३४ हजार ९४८ हरभरा उत्पादकांनी...
मका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी...औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी...
उच्चदाब वीजग्राहकांना दीडपट ते दहापट...इचलकरंजी, जि. कोल्हापूर : महाराष्ट्र विद्युत...
अकोल्यात कोरोनाचा कहर कायम विदर्भात...अकोला ः जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग...
निर्यातदारांनी निर्यातीच्या द्राक्षांचे...नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम सुरू...
नांदेडमध्ये ८६२ शेतकरी गटांतर्फे थेट...नांदेड : जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८६२ शेतकरी...
परभणीत दोन महिन्यात १३०० टन फळे,...परभणी : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा...
नाशिक : अफवेमुळे दरावर परिणाम; टोमॅटो...नाशिक  : कसमादे पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांनी...
लातूरमध्ये टाळेबंदीत शेतकऱ्यांच्या...लातूरः टाळेबंदीच्या काळात लातूर बाजार समितीचा अडत...
अन्य जिल्ह्यातून परभणीत येण्यास कृषी...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
बहुभक्षीय उपद्रवी कीड ः वाळवंटी टोळवाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही कीड मोठ्या प्रमाणात...
उन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
नियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...
प्रत्येकी १० गुंठ्यात पिकवा विविध...भविष्यात किंवा येत्या खरीपापासून त्यासाठी...
समजाऊन घ्या ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प ‘आमचं गाव-आमचा विकास' या लेखमालेमध्ये आपण शाश्वत...
असे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...