मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, दुधनीला केंद्रे

सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत. शेतकऱ्यांनी महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशनने नेमलेल्या सबएजंट संस्थेमार्फत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी भास्कर वाडीकर यांनी केले .
 purchase center of green gram, udid for Barshi, Akkalkot, Dudhani, Solapur

केंद्र शासनाने आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. मुगाला प्रतिक्विंटल ७१९६ रूपये, उडीद प्रतिक्विंटल ६००० रूपये असा हमीभाव आहे. जिल्ह्यात सोलापूर, अक्कलकोट, दुधनी, बार्शी, कुर्डूवाडी याठिकाणी १५ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी पीक पेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स (खाते क्रमांक आणि आयएफएससी कोडसह) सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. 

शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर खरेदी केंद्रावर माल कधी आणावा, याचा नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस येईल. त्यानंतरच शेतकऱ्यांनी वाळलेला, स्वच्छ व काडीकचरा विरहित माल खरेदी केंद्रावर आणावा. खरेदी केलेल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना बँक तपशिलाप्रमाणे एनईएमएल पोर्टलवरून परस्पर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाडीकर यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com