agriculture news in marathi Purchase of cotton on 1000 quintals in Hingoli district | Agrowon

हिंगोली जिल्ह्यात १ हजार क्विंटलवर कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 मे 2020

हिंगोली : शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ हजार ८२६ शेतकऱ्यांनी ४४ हजार २२७ क्विंटल कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी बुधवार (ता.६) पर्यंत एका खरेदी केंद्रांवर ५९ शेतकऱ्यांचा १ हजार १७९.८५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हिंगोली : शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ हजार ८२६ शेतकऱ्यांनी ४४ हजार २२७ क्विंटल कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी बुधवार (ता.६) पर्यंत एका खरेदी केंद्रांवर ५९ शेतकऱ्यांचा १ हजार १७९.८५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ (फेडरेशन) च्या जिल्ह्यातील हिंगोली, जवळा बाजार (ता.औंढानागनाथ), वसमत (हयातनगर) येथील केंद्रावर शेतकऱ्यांना नोंदणीसाठी मंगळवार (ता.५) पर्यंतची मुदत देण्यात आली होती. विहित कालावधीत हिंगोली येथील बाजार समितींतर्गंत खरेदी केंद्रावर एकूण १२९ शेतकऱ्यांनी ३ हजार ८०० क्विंटल कापूस विक्रीसाठी, जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीकडे १ हजार २०२ शेतकऱ्यांनी ३० हजार १७२ क्विंटल कापूस विक्रीसाठी आणि वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ४९५ शेतकऱ्यांनी १० हजार २५५ क्विंटल कापसाच्या विक्रीसाठी नोंदणी केली. 

जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गंत भारतीय कापूस महामंडळाच्या मार्डी येथील खरेदी केंद्रावर बुधवार (ता.६) पर्यंत एकूण ५९ शेतकऱ्यांचा १ हजार १७९.८५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. अन्य दोन ठिकाणच्या केंद्राअंतर्गंतचे शेतकरी कापूस खरेदी सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...