बीड विभागात कापसाची १६ लाख ११ हजार क्विंटलवर खरेदी

बीड : कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची साथ मिळाल्याने बीड विभागात सध्या २० पेक्षा जास्त जिनिंगमध्ये कापसाची खरेदी सुरू आहे. तरीही प्रत्यक्ष खरेदी करताना येणाऱ्या मजुरांसह इतर अडचणी व वातावरणाच्या परिणामामुळे कापूस खरेदीची गती लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत प्रचंड मंद असल्याची स्थिती आहे.
 Purchase of cotton at 16 lakh 11 thousand quintals in Beed division
Purchase of cotton at 16 lakh 11 thousand quintals in Beed division

बीड : कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची साथ मिळाल्याने बीड विभागात सध्या २० पेक्षा जास्त जिनिंगमध्ये कापसाची खरेदी सुरू आहे. तरीही प्रत्यक्ष खरेदी करताना येणाऱ्या मजुरांसह इतर अडचणी व वातावरणाच्या परिणामामुळे कापूस खरेदीची गती लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत प्रचंड मंद असल्याची स्थिती आहे. 

लॉकडाऊनपूर्वी कापूस पणन महासंघातर्फे बीड विभागात दिवसाला चार ते पाच हजार क्विंटल कापसाची खरेदी होत होती. आज ती केवळ पाचशे ते एक हजार क्विंटलवर येऊन ठेपली आहे. जिनिंगमध्ये मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळी ही स्थिती होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाढते ऊन, वातावरणातील बदल हेसुद्धा कापूस खरेदीच्या गतीला ब्रेक लावण्यास कारणीभूत ठरत आहे. 

बीड जिल्ह्यात कौडगाव येथे दोन, अंबाजोगाई १, माजलगाव तालुक्यात सात ठिकाणी, बीडमध्ये एका ठिकाणी, केज तालुक्यात तीन ठिकाणी, धारूरमध्ये दोन, भोपा येथे दोन, तर उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका ठिकाणी कापसाची खरेदी सुरू असल्याचे महासंघातर्फे सांगण्यात आले. बीड जिल्ह्यातील दोन ठिकाणी कोरोना संकटामुळे कापूस खरेदी थांबली आहे. विभागात जवळपास २४ हजार शेतकऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात कापूस खरेदीसाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी जवळपास १४ हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे बाकी असल्याची माहिती पणनच्या सूत्रांनी दिली. 

सोळा मेपर्यंत केवळ सात जिनिंगमधून कापसाची खरेदी सुरू होती. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रेडरपदी नियुक्ती केली. त्यामुळे सात जिनिंगमधील खरेदी आता २२ जिनिंगवर येऊन पोचली. मात्र अन्य अडचणींनी खरेदीस ब्रेक लावला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com