नांदेडमध्ये सव्वा दोन लाख क्विंटलवर कापूस खरेदी

नांदेड : जिल्ह्यातराज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या (फेडरेशन) तीन आणि भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) पाच अशा एकूण आठ केंद्रांवर मंगळवार (ता.१४) पर्यंत नोंदणीकृत ११ हजार ५४३ शेतकऱ्यांचा २ लाख ४६ हजार ४२० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
Purchase of cotton at 2.25 lakh quintals in Nanded
Purchase of cotton at 2.25 lakh quintals in Nanded

नांदेड : जिल्ह्यात कोरोना साथीमध्ये राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या (फेडरेशन) तीन आणि भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) पाच अशा एकूण आठ केंद्रांवर मंगळवार (ता.१४) पर्यंत नोंदणीकृत ११ हजार ५४३ शेतकऱ्यांचा २ लाख ४६ हजार ४२० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

शासकीय कापूस खरेदी अंतिम टप्प्यात आली आहे. आता केवळ कंधार आणि नायगाव तालुक्यातील नोंदणीकृत सुमारे १ हजार १२ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी शिल्लक आहे. येत्या २ ते ३ दिवसांत ती पूर्ण होईल, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनापूर्वी आणि कोरोनामध्ये शासकीय तसेच खासगी मिळून एकूण ५१ हजार ११  लाख ७ हजार ६७२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. 

कोरोना साथीमुळे शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी ३७ हजार ५५१ शेतकऱ्यांनी लिंकव्दारे ऑनलाइन पध्दतीने आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे ऑफलाइन पध्दतीने २ हजार २९७ असे एकूण ३९ हजार ८४८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. महासंघातर्फे तामसा (ता.हादगाव), पोमनाळा (ता.भोकर), भोकर, तर महामंडळातर्फे कलदगाव (ता.अर्धापूर), कुंटूर (ता.नायगाव), नायगाव, धर्माबाद, किनवट या ठिकाणी खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. परंतु, पावसामुळे तसेच अन्य कारणांनी अडचणी आल्या. त्यामुळे अन्य जिल्ह्यातील, तसेच शेजारी तेलंगणा राज्यातील केंद्रांवर कापूस खरेदीसाठी विनंती करण्यात आली. परंतु, त्यासाठी परवानगी मिळाली नाही.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिलेल्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांतर्फे गावनिहाय नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पडताळणी करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील ९ हजार ४५० शेतकऱ्यांकडे सुमारे २ लाख ५ हजार ४३४ क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे आढळून आले. मंगळवार (ता.१४) पर्यंत जिल्ह्यातील आठ केंद्रांवर ११ हजार ५४३ शेतकऱ्यांच्या २ लाख ४६ हजार ४२० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्यामुळे केवळ कंधार आणि नायगाव तालुक्यातील सुमारे १ हजार १२ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे. शिल्लक कापसाची खरेदी येत्या २-३ दिवसांत होईल. 

या व्यतिरिक्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे घरात पडून असलेल्या कापसाची शासकीय केंद्रांवर विक्री करण्यासाठी संबंधित तालुक्याचे तहसिलदार, सहायक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाशी संपर्क साधावा. खरेदी केंद्रावर चांगल्या प्रतीचा कापूस आणावा. व्यापाऱ्यांचा कापूस शेतकऱ्यांनी स्वतःच्या नावे टाकून आणल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शारीरिक आंतर तसेच स्वच्छतेचे पालन करुन खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, असे आवाहन  डॉ. ईटनकर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रविण फडणीस यांनी केले.

लॉकडाऊनपूर्वी कापूस पणन महासंघ, सीसीआय, खासगी बाजार, थेट पणन परवानाधारक, कृषी उत्पन्न बाजार समित्याअंतर्गतच्या व्यापाऱ्यांतर्फे एकूण ३९ हजार ८७३ शेतकऱ्यांचा ८ लाख ६१ हजार २५२.७१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com